तुमचे सेवाकार्य वाढवा
()
About this ebook
आज अलौकिक दैवत्व अस्तित्वात आहे का? अलौकिक गोष्टीत मी कार्यरत होऊ शकतो का? देव तरीही लोकांना बरे करत असला तरीही, तो सर्वांना बरे का करत नाही? आरोग्याच्या अभिषेकाला मी कसा ग्रहण करू शकतो?डाग-हेवार्द मिल्सच्या ह्या उत्साही पुस्तकाच्या द्वारे पवित्र आत्म्याच्या प्रदर्शन ह्यावरील अनेक प्रश्नांची उत्तरे शोधून काढा
Dag Heward-Mills
Bishop Dag Heward-Mills is a medical doctor by profession and the founder of the United Denominations Originating from the Lighthouse Group of Churches (UD-OLGC). The UD-OLGC comprises over three thousand churches pastored by seasoned ministers, groomed and trained in-house. Bishop Dag Heward-Mills oversees this charismatic group of denominations, which operates in over 90 different countries in Africa, Asia, Europe, the Caribbean, Australia, and North and South America. With a ministry spanning over thirty years, Dag Heward-Mills has authored several books with bestsellers including ‘The Art of Leadership’, ‘Loyalty and Disloyalty’, and ‘The Mega Church’. He is considered to be the largest publishing author in Africa, having had his books translated into over 52 languages with more than 40 million copies in print.
Related to तुमचे सेवाकार्य वाढवा
Related ebooks
लायकोस: अदिक्षित लोक आणि सेवाकार्य Rating: 0 out of 5 stars0 ratingsदुष्ट आत्मे आणि त्यांच्याशी कसा व्यवहार कराल Rating: 5 out of 5 stars5/5अभिषेकाचे मधुर प्रभाव Rating: 0 out of 5 stars0 ratingsमंडळी रोपण Rating: 0 out of 5 stars0 ratingsबोलावलेले पुष्कळ आहेत Rating: 0 out of 5 stars0 ratingsत्यांना सांगा तुम्ही आत्मे जिंकणारा का व्हायला पाहिजे याची १२० कारणे Rating: 0 out of 5 stars0 ratingsशापांना निष्क्रिय कसे करावे Rating: 0 out of 5 stars0 ratingsझाड आणि तुमचे सेवाकार्य Rating: 0 out of 5 stars0 ratingsविजय रहस्य Rating: 0 out of 5 stars0 ratingsअशक्तपणा आणि रोग नष्ट करा: अशक्तपणा आणि रोगांचे बळ नष्ट करण्यासाठी शक्तिशाली प्रार्थना Rating: 0 out of 5 stars0 ratingsअनुसरण करण्याची कला Rating: 0 out of 5 stars0 ratingsप्रार्थना कशी करावी Rating: 0 out of 5 stars0 ratingsअभिषिक्त आणि त्याचा अभिषेक Rating: 0 out of 5 stars0 ratingsगमावणे दुखसहन बलिदान आणि मृत्युमुखी पडणे Rating: 0 out of 5 stars0 ratingsचमत्कार Rating: 0 out of 5 stars0 ratingsविश्वासातून माघारी जाणे Rating: 0 out of 5 stars0 ratingsइतर लोक.... Rating: 0 out of 5 stars0 ratingsसेवाकार्यातील नैतिकता Rating: 0 out of 5 stars0 ratingsBhagwad Geeta Se Sikhen Safalta ke Sutra Rating: 0 out of 5 stars0 ratingsअनागाझो Rating: 0 out of 5 stars0 ratingsतुमच्या सेवाकार्याचा संपूर्ण पुरावा तुम्ही कसा तयार करावा Rating: 0 out of 5 stars0 ratingsतुम्ही देवासमवेत दररोज परिणामकारक शांत समय कसा घालवू शकता Rating: 0 out of 5 stars0 ratingsत्याला नाव दया ! त्यावर दावा करा ! ते प्राप्त करा ! Rating: 0 out of 5 stars0 ratingsजे घडले तोच न्याय Rating: 0 out of 5 stars0 ratingsआपल्या पाळकीय सेवेला बदला Rating: 5 out of 5 stars5/5तुम्ही सामर्थी ख्रिस्ती कसे होऊ शकता Rating: 0 out of 5 stars0 ratingsजगत कर्ता कोण? Rating: 0 out of 5 stars0 ratingsमी कोण आहे Rating: 4 out of 5 stars4/5रक्तातील सामर्थ्य Rating: 5 out of 5 stars5/5प्रतिक्रमण Rating: 0 out of 5 stars0 ratings
Reviews for तुमचे सेवाकार्य वाढवा
0 ratings0 reviews
Book preview
तुमचे सेवाकार्य वाढवा - Dag Heward-Mills
येशू ख्रिस्ताकरिता जगांत पोहंचण्यासाठी चमत्कार आणि प्रदर्शन ही आपली फक्त एकच संधी आहे. देवाच्या राज्याकरिता प्रत्येक वंश, राष्ट्र, आणि लोकांपर्यंत पोहोंचण्यासाठी त्याच आपल्याला संधी आहेत. देवाने त्याच्या सेवकांना जे करण्याचे पाचारण दिले आहे ते पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकरिता ह्या संधी आहेत.
बारा शिष्य आणि इतर सत्तर जण ज्यांना येशूने पाठविले होते त्यांच्याकरिता आत्म्याचा चमत्कार आणि प्रदर्शन उपलब्ध होते. महान आदेशाद्वारे ते आज आपल्या सर्वांकरिता सुद्धा उपलब्ध आहेत. जर आपण देवाने आपल्याला काय दिले आहे हे माहित करून घेण्यांस आणि जाणण्यांस सुरुवात केली तर ते आपल्या सर्वांकरिता आहे.
१. पवित्र आत्म्याचे चमत्कार आणि प्रदर्शन हे ख्रिस्तासाठी सर्व जगांत पोहंचण्यासाठी तुम्हांला साहाय्य करतील.
एकदा जेव्हा माझ्या देशातील विविध क्षेत्रातील निवडणुकीचा निकाल जाहीर झाला, तेव्हा दूरस्थ क्षेत्रामध्ये किती लाखों लोक राहातात ह्याची मला जाणीव झाली. नाश पावत असलेल्या आत्म्यांसाठी देवाचे हृदय रक्तस्राव होत आहे. राष्ट्रासाठी सामाजिक सेवा प्रदान करण्याकरिता आपल्याला राजकीय दबावाखाली झुकण्याची मुळीच आवश्यकता नाही. शाळां आणि विद्यापीठ ह्यांसारख्या सामाजिक सेवांच आपल्याला राष्ट्रासाठी उपयुक्त करीत नाहीत.
मंडळी ही एक विशिष्ट संस्था आहे जी देवाने विशिष्ट सामर्थ्य आणि अभिषेकासह अभिषिक्त केली आहे. त्या सामर्थ्य आणि अभिषेकासह देवाने आपल्याला जे करण्यासाठी पाचारण दिले आहे ते आपण करू शकतो. हरवलेल्या मानवजातीला साहाय्य करण्यासाठी देवाने उपदेश, शिक्षण, आणि बरे करणे ह्या पद्धतीची निवड केली.
२. पवित्र आत्म्याचे चमत्कार आणि प्रदर्शन हे तुम्हांला दुर्बोधतेमधून (अंधुकतेमधून) बाहेर काढील.
तुम्हांला दुर्बोधतेमधून (अंधुकतेमधून) बाहेर येणे आवश्यक आहे. जगामध्ये तुमच्या सेवाकार्याच्या उपस्थितीची जाणीव झाली पाहिजे आणि ती दिसून आली पाहिजे! तुमच्या महान बुद्धी विषयी जर ऐअक्ले नाही आणि तिला पाहिले नाही तर तिचा काय उपयोग? येशू एका अप्रसिद्ध सुताराच्या कुटुंबांत वाढला होता, परंतु देवाने त्याला कांहीतरी विशेष असे दिले होते. येशूला दुर्बोधतेमधून काय बाहेर काढणार होते? कोणालाहि त्याचे संदेश ऐकण्यासाठी कोण भाग पाडणार होते? जाहिरातीच्या आधुनिक पद्धतीशिवाय येशू काय करणार होता? पवित्र आत्म्याचे चमत्कार आणि प्रदर्शन ह्यांनीच येशूला अंधुकतेपासून बाहेर आणिले होते.
तुम्ही उठून अंधुकतेमधून बाहेर येण्यासाठी पवित्र आत्म्याचे चमत्कार आणि प्रदर्शन तुम्हांला दिले आहेत. येशूने कधीच कोणतेहि पुस्तक लिहिले नव्हते, कारमध्ये बसून प्रवास केला नव्हता, किंवा ट्रेन किंवा विमान पकडले नव्हते, तरीहि तो प्रसिद्ध झाला होता.
बायबल म्हणते की, त्याची कीर्ति लागलीच गालीलाच्या चहूंकडल्या सर्व प्रांतांत पसरली आणि सबंध शहर दाराशी लोटले. (मार्क १:२८, ३३). ह्या जगातील सर्व शहरांनी आपल्या सुवार्ता सभांच्या दाराशी जमले पाहिजे, अशी जर तुमची इच्छा असेल तर, आपल्याला बरे करण्याचा अभिषेक असलाच पाहिजे.
ह्या जगातील सर्व शहरांनी आपल्या मंडळ्यांमध्ये यावे अशी जर तुमची इच्छा असेल तर पवित्र आत्म्याचे चमत्कार आणि प्रदर्शन हीच गुरुकिल्ली आहे. बरे करण्याचा अभिषेक संपूर्ण शहराला तुमच्या दाराशी घेऊन येईल जेणेकरून तुम्ही त्यांना येशू ख्रिस्ताबद्दल सांगू शकता.
३. पवित्र आत्म्याचे चमत्कार आणि प्रदर्शन हे भग्नहृदयी (निराश झालेल्या) लोकांना तुमच्या सेवाकार्याकडे आकर्षित करील.
येशूने म्हटले की, भग्न हृदयी लोकांना सांत्वन देण्यांस त्याला अभिषेक अरण्यांत आला होता. तुमच्या प्रियकर किंवा मैत्रिणी बरोबर तुमचे संबंध तुटण्यापेक्षा भग्न हृदयाचे असणे अधिक आहे. सर्व साधारणपणे भग्न हृदयाचे कारण निराशा आहे. जीवनाने त्यांना काय दिले हे पाहून अनेक लोक आश्चर्यचकित झाले आहेत. सर्व कांही ठीक आहे असे समजून लोक जगतात परंतु ते हृदयांत रक्तस्राव होत असलेले, निराशा आणि दु:खापत पावलेले लोक असतात.
मनुष्याच्या अनेक समस्या ह्या औषधाने, मानसशास्त्रज्ञ, किंवा मानसरोग चिकित्सक द्वारे ठीक होऊ शकत नाहीत. अनेक लोकांना आशा देण्यासाठी त्यांना देवाच्या स्पर्शाची आवश्यकता आहे. लोकांच्या भग्न हृदयांना बरे करण्यासाठी देव लोकांच्या जीवनांत येण्याच्या व्यवसायांत आहे.
लोक चर्चला का येतात ह्याचे पुष्कळ राजकारणी लोकांना आश्चर्य वाटते कारण पाळक जनतेकडून पैसे घेतात असे त्यांना वाटते. लोक अनुमानित फसवणूकिच्या
द्वारे का बघत नाहीत ह्यांचे त्यांना आश्चर्य वाटते. हे पाहा, लोकांच्या ज्या समस्या असतात त्यां नेहमीच स्पष्ट नसतात. वरवरून लोक हसत असतात परंतु आंतून ते रडत असतात. जे मंडळीची निंदा करतात त्यांना मंडळी लोकांसाठी काय करते ह्याची कल्पना नसते.
एकदा मी टेलीव्हिजनवर एका सुप्रसिद्ध रोग बरे करणा-या सुवार्तीकाची मुलाखात पाहिली. त्याला त्याचा पगार किती होता, त्याची घरें व त्याच्या कार्स किती आहेत ह्याबद्दल अनेक प्रश्न विचारण्यांत आले होते. त्या चर्चेच्या कार्यक्रमाचा संचालक त्याला मूर्ख बनविण्याचा पयत्न करीत होता.
मग त्यांनी फोनवर असलेल्या व्यक्तीस ज्याला प्रार्थनेची आवश्यकत होती त्याच्याशी बोलणे सुरु केले. अचानक वातारण बदलून गेले. फोन करणा-या व्यक्तीला कर्करोग होता आणि तो मरणावस्थेत होता. सुवार्तीकाने त्याच्यासाठी प्रार्थना करावी अशी त्याची इच्छा होती. त्या संचालकाने विचारलेले सर्व खवचट प्रश्नांचा आता कांहीच अर्थ उरला नव्हता. टेलीव्हिजनचा संचालक ज्याला त्वरित मदतीची गरज होती अशा निराश आणि शोकग्रस फोन करणा-याचा सामना करीत होता. केवळ सुवार्तीकच त्याला मदत करू शकत होता. सुवार्तीकाच्या सेवकार्याची उपयुक्तता सर्वांना सपष्ट झाली होती. अनेक लोक त्यांच्या असाध्य आणि हताश स्थितीसाठी प्रार्थना करण्याची फोनवर विनंती करीतच राहिले होते.
लोकांच्या गरजां आहेत आणि बरे करण्याचा अभिषेकच त्यां गरजां पूर्ण करील. पवित्र आत्म्याचे चमत्कार आणि आविष्कर करण्याचे देवाचे सामर्थ्य जर तुम्हांला प्राप्त आहे तर, भग्न हृदयी लोकांच्या झुंडी तुमच्याकडे येतील.
४. पवित्र आत्म्याचे चमत्कार आणि प्रदर्शन हे तुमच्या सेवाकार्यांस समाजाशी संबद्ध करील.
संबद्ध असणे
म्हणजे महत्वाचे असणे.
जेव्हा बरे करण्याचा अभिषेक कार्यरत असतो तेव्हा आपण जगाशी संबद्ध होतो. जेव्हा भग्न हृदयाच्या लोकांना पुनर्संचयित केले जाते आणि गरिबांना सुवार्ता सांगितली जाते तेव्हा आपण संबद्ध होतो. दुष्तात्में लोकांना जाच्तात आणि त्यांच्या जीवनांत भीती निर्माण करतात. बरे करण्याचा अभिषेक लोकांना दुष्टात्म्यांच्या जाचातून सोडवील.
अनेक राष्ट्रांवर भय आणि अंधश्रद्धा शासन करीत आहेत. पवित्र आत्म्याच्या चमत्कार आणि आविष्करणांद्वारे शापांना नष्ट केले जाते आणि आरोग्य प्राप्त होते. अनेक लोक अलौकिक सामर्थ्यांस समजतात. जर तुम्हांला बरे करण्याचा अभिषेक प्राप्त आहे तर तुम्ही जे निवासी वाईट अलौकिक शक्तीत छेडखानी करतात त्यांच्या समोर उभे राहून त्यांना आवाहन करू शकता! जर तुमच्यापाशी रविवारच्या शाळेचा नुसता एक संदेश असेल तर वर्तमान काळातील चेटकिणी आणि जादूगार ह्यांच्याशी तुम्ही जुळणार नाहीत.
आपले हे जग अंधश्रद्धेने खूप भरलेले आहे. अशा कांही नद्या आहेत के जेथे मासे धरण्याची परवानगी नाही! कधी कधी तर ह्या नद्यांतून लोकांना पाणी देखील भरू देत नाहीत. अंध श्रद्धेमुळे अनेक धरणे बांधली जाऊ शकत नाहीत. लोक वेगवेगळ्या गोष्टींना घाबरत आहेत. कधी कधी अंधश्रद्धेमुळे आपण विशिष्ट वेळेस विशिष्ट पोशाख घालण्यांस घाबरतो. कांही विशिष्ट रस्त्यांवर तुम्ही पथ-दीप लावू शकत नाही कारण त्या रस्त्यांवर निवास करीत असलेल्या दैवतांच्या उपस्थिती तेथे असते असे मानले जाते. लोक कांही विशिष्ट वेळेस कांही विशिष्ट रस्त्यांचा उपयोग करीत नाहीत. दिवे बंद करण्यांस लोक घाबरतात. लोक कधी कधी शुक्रवारी प्रवास करण्यांस घाबरतात. कोणत्याहि विशिष्ट महिन्याच्या १३ तारखेबद्दल लोकांची एक प्रकारची अंधश्रद्धा आहे. जर १३ तारीख शुक्रवारी पडते तर ती सर्वांत वाईट गोष्ट असते. विमान कंपन्यांना सुद्धा ह्याची जाणीव आहे. अनेक विमानांमध्ये १३ संख्येचे आसन नाही. मोठमोठ्या सदनिका इमारतींमध्ये (अपार्टमेन्ट बिल्डींग्स) तेरा नंबरचा मजला नाही.
एके दिवशी, मी विमानाने प्रवास करीत होतो. विमान खाली उतरतांना फारच खडबडितपणे ते उतरले होते आणि वैमानिकाने त्यासाठी क्षमा मागून तो दिवस शुक्रवार तारीख १३चा होता म्हणून असे घडले हे त्यांनी स्पष्ट केले.
देवा दया कर! अनेक लोक भयामध्ये जगात आहेत.
मंडळीजवळ काही देण्यासारखे असेल तर ती मंडळी संबद्ध बनते. लोकांच्या गरजांचे जेव्हा आपल्याकडे निरसन असते तेव्हा आपण त्यांच्याशी संबद्ध बनतो. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने मंडळी जे कांही देऊ करते जे कोणतेही सरकार देऊ शकत नाही. मंडळी जे देऊ शकते ते शिक्षक किंवा वैद्यकीय डॉक्टर देऊ शकत नाही. केवळ देवच भग्न हृदय बरे करून लोकांचा उद्धार करू शकतो. ह्या जगाच्या प्रत्येक भागास पवित्र आत्म्याच्या चमत्काराची आणि आविष्करणांची आवश्यकता आहे.
मंडळी ह्या नात्याने आपला संबद्ध शाळां किंवा विद्यापीठ चालू केल्याने होत नाही. सरकारने शिक्षण प्रदान केले पाहिजे. जेव्हा मंडळी शिक्षण प्रदान करते तेव्हा ख-या अर्थाने राष्ट्राला ती आपली प्रीति भेट आहे हे दिसलेच पाहिजे. येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाद्वारे मानवजातीला तारण प्रदान करण्यांत आले आहे.
आपल्याला महान आदेशाची जबाबदारी सोपविण्यांत आली आहे. कुठल्याहि संस्थेला ही जबाबदारी सोपविण्यांत आली नाही. आपला संबद्ध उपदेश आणि शिक्षण देण्याद्वारे होतो. रोग्यांना बरे करण्याद्वारे आपला संबद्ध होतो. पवित्र आत्म्याच्या चमत्काराने आणि आविष्करणाच्या सामर्थ्याने आपला संबद्ध होतो.
५. पवित्र आत्म्याचे चमत्कार आणि प्रदर्शन हे बंदिस्त आत्म्यांना तुमच्या मंडळीकडे खेचून आणील.
बरेच लोक भुतांनी झपाटलेले आहेत. एके दिवशी, मी माझ्या एका मित्राला भेटलो जो मादक पदार्थाच्या खूप व्यसनाधीन होता. मला त्याच्याबद्दल फारच वाईट वाटले. केवळ देवाचे सामर्थ्यच लोकांना मादक पदार्थ, दारू आणि अनैतिकता ह्यांपासून सोडवू शकते. अनेक लोक बंधनांत जखडले आहेत. ते स्वत:ला मुक्त करू शकत नाहीत. बरे करण्याचा अभिषेकच त्यांना त्यांच्या प्रत्येक बंधनांपासून मुक्त करील.
पवित्र आत्म्याचे चमत्कार आणि प्रदर्शन वांझ स्त्रियांना आशा प्रदान करील. एकदा मी एक माहितीपट पाहिला ज्यांत वंध्यत्वासाठी उपाय म्हणून एका स्त्रिच्या शरीरामध्ये एका सापाला घातले गेले होते. ती एका रानटी याजकाकडे मदतीसाठी गेली होती आणि तिला मूल व्हावे म्हणून अशा प्रकारची मदत तिला दिली गेली होती.
मी स्वत:शीच विचार केला की, वंध्यत्वाची समस्या ही आकलनापलीकडे आहे.
आपण सापाला एवढे भितो की पिंज-यात असलेल्या सांपाजवळ देखील आपण जात नाही. आपण टेलीव्हीजनवर जरी सांप पाहिला तरी आपल्याला त्याची किळस वाटते. मूल होण्यासाठी एक स्त्री जेव्हा स्वेच्छेने तिच्या शरीरांत सांप घालण्याची परवानगी देते तेव्हा ह्यावरून तिच्या गरजेची गहनता आपल्याला दिसून येते.
मी उपदेश देण्यासाठी माझा वैद्यकीय व्यवसाय का सोडून दिला असे लोक मला नेहमी विचारतात. एक उपदेशक म्हणून मी कांही महत्वाचे काम करीत आहे का ह्याचे त्यांना आश्चर्य वाटते. आज मी जे काम करीत आहे ते एका डॉक्टरपेक्षाहि महत्वाचे काम आहे. औषधांद्वारे जर येशूने ह्या जगाची चांगल्या प्रकारे मदत केली असती तर तो एक डॉक्टर झाला असता. परंतु तो एक उपदेशक होता आणि तुम्ही त्यावरून काय ते समजा!
येशूने जाहीर केले की तो ठेचलेल्यांना सोडवून पाठविण्यासाठी आला होता. ठेचलेला व्यक्ती हा एक दुखावलेला व्यक्ती असतो. जीवन हे वेदना, दुखापत, आणि निराशेने भरलेले आहे, आणि येशूचा बरे करण्याचा अभिषेक दुखावलेल्यांस आणि ठेचलेल्यांस बरे करतो.
"परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दीनांस सुवार्ता सांगण्यांस त्याने मला अभिषेक केला; त्याने मला पाठविले आहे, ते अशासाठी की, धरून नेलेल्यांची सुटका करावी व अंधळयांस पुन्हा दृष्टीचा लाभ ह्याची घोषणा करावी, ठेचले गेले आहेत त्यांस सोडवून पाठवावे.
लूक ४:१८
अलीशा पाण्याला शुद्ध करण्यासाठी नगरामध्ये गेला होता कारण ते पाणी दूषित होते.
त्या नगरचे रहिवासी अलीशास म्हणाले, पाहा, हे नगर मनोहर स्थळी वसले आहे, हे आमच्या स्वामीस दिसतच आहे; पण येथले पाणी फार वाईट असल्यामुळे जमिनीत कांही पिकत नाही. त्याने म्हटले, एक नवे पात्र मजकडे आणा व त्यांत मीठ घाला त्यांनी ते त्याजकडे आणिले. मग तो पाण्याच्या झ-यानजीक गेला व त्यांत ते मीठ टाकून म्हणाला, परमेश्वर म्हणतो, मी हे पाणी चांगले करितो. यापुढे याने मृत्यू येणारा नाही व पीक बुडणार नाही. अलीशाच्या या वचनानुसार ते पाणी चांगले झाले; ते आजवर तसेच आहे.
(२ राजे २:१९-२२).
देव जेव्हा तुमचे पाणी शुद्ध करतो, तेव्हा तो तुमच्या जीवनाच्या मूलभूत गरजां पूर्ण करतो. ह्या जगांत पुष्कळ गरजवंत लोक आहेत हे देव तुम्हांला दाखवीत आहे. असे कांही लोक आहेत की त्यांच्या आजारांचा इलाज होत नाही. गरीब देशांमध्ये, कांही स्त्रियां झाडाखाली मुलाला जन्म देतात. आणि ह्याचकरिता गरीब लोकांना सुवार्ता सांगण्यासाठी आपल्याला अभिषेक केला गेला आहे.
ह्या जगाचे गरीब लोक हे संख्येने श्रीमंतांपेक्षा जास्त आहेत. देव गरीब लोकांपर्यंत आपल्या हृदयांचा विस्तार करीत आहे. जोपर्यंत तुमच्याआवळ कांही चांगली बातमी नसेल तोपर्यंत तुम्ही ह्या जगातील गरीब लोकांकडे जाऊन त्यांच्याशी बोलू शकता नाही. सुवार्ता त्यांच्या जीवनावर व्यावहारिकरित्या कसा परिणाम करील हे त्यांना जाणून घेण्याची इच्छा आहे. त्यांच्या सर्व समस्यांनिशी, त्यांच्या आजारांनिशी, आणि त्यांच्या अत्यंत गरीबिनिशी ते सुवार्तेचा सिद्धांत कसा समजतील?
अधिक चमत्कार घडावेत म्हणून आपण प्रार्थना केली पाहिजे. आपल्या हृदयांनी अधिक चमत्काराची इच्छा केलीच पाहिजे! नाहीतर, आपण आपल्या छोट्याशा कोप-यांत बसून मजा मारत असतांना सर्व जनता नरकांत जात राहील.
६. पवित्र आत्म्याचे चमत्कार आणि प्रदर्शन हे तुमच्या सेवाकार्यामध्ये देवाचे नांव थोर करील.
हे परमेश्वरा, मला बरे कर म्हणजे मी बरा होईन; मला तार म्हणजे मी तरेन; कारण तू माझा स्तवन विषय आहेस.
यिर्मया १७:१४
यिर्मयाने रडत आरोळी मारली, हे परमेश्वरा, मला बरे कर म्हणजे मी बरा होईन!
जर देव तुम्हांला बरे करतो, तर तुम्ही नक्कीच बरे होता! जर देव तुम्हांला तारतो, तर तुम्ही नक्कीच तारले जाता! मनुष्याच्या बरे करण्याची पद्धती फारच अपुरी आहे. देव लोकांच्या जीवनांत जी भूमिका पार पाडू शकतो त्यांस तुम्ही बरे करण्याच्या अभिषेकाद्वारे विस्तारित कराल.
सत्य हे आहे की देव बरे करतो ह्याचा अर्थ असा नाही की तो वैद्यकीय विज्ञानास मान्यता देत नाही. देव वैद्यकशास्त्राच्या विरुद्ध नाही. खरे पहिल्यांस, औषधांना विकसित करण्याचे मानवाला जे ज्ञान प्राप्त आहे ते देवापासूनच आहे. तोच त्या देणगीचा स्रोत आहे. एक डॉक्टर ह्या नात्याने मी वैद्यकीय विज्ञानावर विश्वास ठेवतो. वैद्यकीय विज्ञान आणि डॉक्टर्स यांसाठी देवाला धन्यवाद. आपण त्यांच्या शिवाय करू शकत नाही.
तथापि, वैद्यकीय विज्ञानापेक्षा आपल्याला देण्यासाठी देवाजवळ खूप असे कांही आहे. वैद्यकीय विज्ञान जे करू शकत नाही ते तो करू शकतो. तो जे करू शकतो ते वैद्यकीय विज्ञान करू शकत नाही. कधी कधी वैद्यकीय विज्ञान जे करू शकते ते तो करतो. तो सर्व कांही चांगलेच करतो हेच आपल्याला माहित आहे.
सॅन फ्रान्सिस्को येथे आलेल्या भूकंपामधून वांचलेल्या माणसाची गोष्ट सांगणे मला आवडते. भूकंपाच्या त्याच्या अनुभवानंतर त्याची मुलाखत घेण्यांत आली होती. इमारतीच्या खाली असलेल्या मलाब्यामध्ये तो तीन दिवस आणि तीन रात्री जिवंत राहिला होता. कोसळलेल्या इमारतीच्या खाली तो एवढा दीर्घ काळ जिवंत कसा राहिला हे त्याला विचारण्यांत आले होते.
त्याने उत्तर दिले, "मी दृढ इच्छाशक्ती असलेला व्यक्ती आहे. मी जे कांही करण्यचे ठरवितो, मग मला ते करण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. मी गतिमार्गावर राहण्यांस सक्षम आहे. मी डावीकडे किंवा उजवीकडे वळत नाही! मी मजबूत निर्धार आणि इच्छाशक्ती असलेला मनुष्य आहे आणि म्हणून मी मरण्यांस नकार दिला! मी जिवंत राहाण्याचा निर्धार केला आणि म्हणून मी जीवन राहिलो असा माझा विश्वास आहे!
त्याच्या पत्नीची सुद्धा मुलाखत घेण्यांत आली होती. तिने सांगितले, हा, तर, मी माझ्या पतीला चांगली ओळखते आणि त्यांच्याशी माझे लग्न होऊन खूप वर्षें झाली. ते एक फार मजबूत इच्छाशक्तीचे व्यक्ती आहेत! त्यांनी जे कांही करण्याचा निर्धार केला त्यांपासून त्यांना कोणतीही गोष्ट उजवीकडे किंवा डावीकडे सरकवू शकत नाही. ते एक खंबीर व्यक्ती आहेत. ते एक अत्यंत निर्धारित व्यक्ती आहेत. ते आपला प्रकल्प पूर्ण करतात! ते पुढे जात राहतात. ते प्रतिकूल परिस्थितीतहि डगमगत नाहीत. मी माझ्या माणसाला ओळखते! त्यांच्याशी लग्न करून मला आता सत्तावीस वर्षें झाली आणि म्हणून ते जिवंत राहणायचा निर्धार करतात, तर ते नक्कीच जिवंत राहातात.
ह्या माणसाच्या डॉक्टरांची सुद्धा मुलाखात घेण्यांत आली होती. त्याला विचारण्यात आले होते, तुमच्या रूग्णाबद्दल जे ह्या आश्चर्यजनक अनुभवातून जिवंत राहिले आहेत तुम्ही काय सांगू इच्छिता?
त्यांनी उत्तर दिले, होय, मला माझ्या रुग्णाबद्दल चांगले माहित आहे की ते एक मजबूत इच्छाशक्तीचे वक्ती आहेत. ते जिवंत राहिले कारण एका व्यक्तीच्या जीवनांत इच्छाशक्तीचे असणे फार महत्वाचे आहे. जेव्हा एक रोगी मरण्याचा निर्णय घेतो, तेव्हा तो मरतोच. जेव्हा तो जिवंत राहाण्याच निर्णय घेतो, तो जिवंत राहतोच.
आठ दिवसांनंतर, ह्या मनुष्याला हृदयविकाराचा झटका आला ह्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता का? तो पटकन मरण पावला! मग मी स्वत:लाच विचारले, त्याची इच्छाशक्ती कोठे गेली?
असे वाटते की, ट्रॅक्टर आणि बुलडोजर ह्यांनी त्याला वांचविले होते. असे वाटते की डॉक्टरांनी