तुमच्या सेवाकार्याचा संपूर्ण पुरावा तुम्ही कसा तयार करावा
()
About this ebook
आज अलौकिक दैवत्व अस्तित्वात आहे का? अलौकिक गोष्टीत मी कार्यरत होऊ शकतो का? देव तरीही लोकांना बरे करत असला तरीही, तो सर्वांना बरे का करत नाही? आरोग्याच्या अभिषेकाला मी कसा ग्रहण करू शकतो?डाग-हेवार्द मिल्सच्या ह्या उत्साही पुस्तकाच्या द्वारे पवित्र आत्म्याच्या प्रदर्शन ह्यावरील अनेक प्रश्नांची उत्तरे शोधून काढा
Dag Heward-Mills
Bishop Dag Heward-Mills is a medical doctor by profession and the founder of the United Denominations Originating from the Lighthouse Group of Churches (UD-OLGC). The UD-OLGC comprises over three thousand churches pastored by seasoned ministers, groomed and trained in-house. Bishop Dag Heward-Mills oversees this charismatic group of denominations, which operates in over 90 different countries in Africa, Asia, Europe, the Caribbean, Australia, and North and South America. With a ministry spanning over thirty years, Dag Heward-Mills has authored several books with bestsellers including ‘The Art of Leadership’, ‘Loyalty and Disloyalty’, and ‘The Mega Church’. He is considered to be the largest publishing author in Africa, having had his books translated into over 52 languages with more than 40 million copies in print.
Related to तुमच्या सेवाकार्याचा संपूर्ण पुरावा तुम्ही कसा तयार करावा
Related ebooks
आपल्या पाळकीय सेवेला बदला Rating: 5 out of 5 stars5/5बोलावलेले पुष्कळ आहेत Rating: 0 out of 5 stars0 ratingsमंडळी रोपण Rating: 0 out of 5 stars0 ratingsअभिषेकाचे मधुर प्रभाव Rating: 0 out of 5 stars0 ratingsसेवाकार्याची कला Rating: 0 out of 5 stars0 ratingsऐकण्याची कला Rating: 0 out of 5 stars0 ratingsअभिषेक पकडून ठेवा Rating: 0 out of 5 stars0 ratingsपवित्र शास्त्राचे पाठांतर करण्यासाठीचे अत्यंत महत्वपूर्ण हस्तपुस्तक Rating: 0 out of 5 stars0 ratingsप्रार्थना कशी करावी Rating: 0 out of 5 stars0 ratingsझाड आणि तुमचे सेवाकार्य Rating: 0 out of 5 stars0 ratingsअनुसरण करण्याची कला Rating: 0 out of 5 stars0 ratingsदुष्ट आत्मे आणि त्यांच्याशी कसा व्यवहार कराल Rating: 5 out of 5 stars5/5तुमचे सेवाकार्य वाढवा Rating: 0 out of 5 stars0 ratingsतुम्ही देवासमवेत दररोज परिणामकारक शांत समय कसा घालवू शकता Rating: 0 out of 5 stars0 ratingsसोपी करण्यात आलेली क्षमाशीलता Rating: 0 out of 5 stars0 ratingsआदर्श विवाह विवाह समुपदेशन हस्तपुस्तिका Rating: 4 out of 5 stars4/5आपले पवित्र शास्त्र वाचा, दररोज प्रार्थना करा Rating: 0 out of 5 stars0 ratingsत्याला नाव दया ! त्यावर दावा करा ! ते प्राप्त करा ! Rating: 0 out of 5 stars0 ratingsप्रभूची सेवा करणे ही उत्तम गोष्ट आहे Rating: 0 out of 5 stars0 ratingsअभिषिक्त आणि त्याचा अभिषेक Rating: 0 out of 5 stars0 ratingsइतर लोक.... Rating: 0 out of 5 stars0 ratingsजे अज्ञानी असतात Rating: 0 out of 5 stars0 ratingsअनागाझो Rating: 0 out of 5 stars0 ratingsविश्वासातून माघारी जाणे Rating: 0 out of 5 stars0 ratingsलायकोस: अदिक्षित लोक आणि सेवाकार्य Rating: 0 out of 5 stars0 ratingsनवीन विश्वासनार्यां साठी अत्यंत महत्वाचे तपशील Rating: 0 out of 5 stars0 ratingsअध्यात्मिक धोके Rating: 0 out of 5 stars0 ratingsत्यांना सांगा तुम्ही आत्मे जिंकणारा का व्हायला पाहिजे याची १२० कारणे Rating: 0 out of 5 stars0 ratingsतुम्हांपैकी एक जण सैतान आहे Rating: 0 out of 5 stars0 ratingsतुम्ही सामर्थी ख्रिस्ती कसे होऊ शकता Rating: 0 out of 5 stars0 ratings
Reviews for तुमच्या सेवाकार्याचा संपूर्ण पुरावा तुम्ही कसा तयार करावा
0 ratings0 reviews
Book preview
तुमच्या सेवाकार्याचा संपूर्ण पुरावा तुम्ही कसा तयार करावा - Dag Heward-Mills
अनुक्रमणिका
घटना ज्या तुमच्या सेवेचा संपूर्ण पुरावा तयार करतात
तुम्ही ओढले जाता त्या व्यक्तीचे अनुसरण करा
नकार स्वीकारा आणि तुमचे सेवाकार्य पूर्ण करा
तुमच्या इच्छांचे अनुसरण करा
तुमच्या धारणांचे अनुसरण करा
देवाच्या प्रेमाला प्रतिसाद द्या
देवाच्या दयेला प्रतिसाद द्या
विभक्तीचा स्वीकार करा
देवाच्या इछेचे रहस्य शोधून काढा
तुमच्या ठराविक पाचारनाचे आज्ञापालन करा
तुमच्या सेवाकार्यावर जा!
ह्याच ठिकाणी तुम्ही जाऊन उपदेश दिला पाहिजे
तुमचे सेवाकार्य परिपूर्ण करा
एक चांगली सेवाकार्य करणारी व्यक्ती तुम्ही बना
देवाची युद्धातील कुऱ्हाड तुम्ही बना
देवाचा उद्देश शोधून काढा
कृपेत चाला
दृष्टांताचे अनुसरण करा
तुमच्या वरदानांचा उपयोग करा
तुमच्या स्थानात उभे राहा
चार अवस्थांमधून चालत राहा
अध्याय १
दैवी घटना ज्या तुमच्या सेवेचा संपूर्ण पुरावा तयार करतात
तू तर सर्व गोष्टींविषयी सावध राहा, दुःखे सोस, सुवार्तिकाचे काम कर, तुला सोपवलेली सेवा पूर्ण कर.
२ तीमथी ४:५
तुमच्या सेवेचा पूर्ण उपयोग करून घेणे शक्य आहे. येशू ख्रिस्ताचे सेवाकार्य तर तुम्ही करू शकणारे सर्वात महत्वाचे कार्य आहे. मानवांना दिलेले सर्वात महत्वाचे सौभाग्य म्हणजे देवासाठी काम करत राहणे. देवासाठी काम करणे म्हणजेच ‘सेवाकार्य’ आहे.त्याचा पूर्ण उपयोग तुम्ही करून घेणे अत्यंत महत्वाचे बनते. ह्या पृथ्वीवर देव तुम्हाला जे काही कार्य देतो ते पूर्ण करणे अत्यंत महत्वाचे असते. तुमच्या सेवाकार्याचा पूर्ण उपयोग करून घेतल्याशिवाय तुम्ही मरण पाहू नये.
तुमचे सेवाकार्य जर तुम्ही पूर्ण केले नाही तर स्वर्गातील आगमन ह्याचा तुम्ही आस्वाद घेणार नाही.
तयार नसलेल्या परीक्षेसाठी कसे काम करावे हे तुम्हाला समजणार नाही! तुमच्या पर्यवेक्षकांना जेव्हा तुम्ही तयार नसता आणि काम तयार नसते असे जेव्हा कळते तेव्हा कसे असते हे तुम्हाला कळेल.
अर्खिप्पाला सांगा की, जी सेवा तुला प्रभूमध्ये मिळाली आहे ती पूर्ण करण्याकडे लक्ष दे.
क्लस्सेकरास पत्र ४:१७
बरेच लोक म्हणतात की त्यांचे पाचारण काय आहे हे त्यांना ठाऊक नसते, ते कसे पूर्ण करावे हे मग त्यांना कसे कळेल! त्यांचे सेवाकार्य आग पूर्णपणे कसे उपयोगात आणावे हे त्यांना कसे समजणार! हे पुस्तक तर तुम्ही सेवाकार्य कसे पूर्ण करावे ह्यावर दिले गेले आहे. तुम्ही जर हे पुस्तक वाचत असाल तर, तुमच्याकडे एक सेवाकार्य आहे. पौलाने अर्चीपस ह्याला दिलेला थोर इशारा पाहा, ‘’तुमचे सेवाकार्य पूर्ण करा.’’ दुसऱ्या शब्दात, तुमचे सेवाकार्य पूर्ण करण्याची खात्री घ्या.
बरेच लोक म्हणतात,’’ तुमच्याकडे आहे तसे माझ्याकडे वरदान नाही आणि तसे कार्यक्षेत्र देखील नाही.’’ आपल्यातील बर्याच लोकांना सेवाकार्यात विशेष पद्धतीने वर्दानीत असे वाटू देत नाही. खरेतर, देवाने अनेकांना वेगळे केले आहे पण बरेच लोक त्याला प्रतिसाद देत नाहीत. बर्याच लोकांना प्रेम दाखवले जाते पण त्याच्याप्रती ते प्रतिसाद देत नाहीत.
देवाच्या पाचरणाला तुम्ही प्रतिसाद देण्यापूर्वी तुम्ही देवदूत पाहाल असा जर तुम्ही विचार केला, तर तुम्ही कधीच प्रतिसादद देणार नाही.
तुमच्या सेवेचा पूर्ण उपयोग करण्यासाठी, देव तुम्हाला कसे बोलावतो आणि फलदायी बनवतो हे तुम्ही जाणून घेतले पाहिजे. तुमचे सेवाकार्य पूर्ण करण्यासाठी, तुमच्या जीवनातील दैवी घटनांना प्रतिसाद तुम्ही दिला पाहिजे.
दैवी घटना
अनेक लोकांना दैवी रीतीने सुसंगत गोष्टी काय आहेत हे समजत नाही. तुम्हाला ते समजावे अथवा नाही, तुमच्या जीवनातील दैवी घटनांना प्रतिसाद देण्यातील अपयश तर तुम्ही सेवाकार्य पूर्ण करणार नाही ह्याची खात्री देतात. अनेक लोक त्यांचे सेवाकार्य पूर्ण करत नाहीत कारण त्यांच्या जीवनातील दैवी गोष्टींना ते प्रतिसाद देत नाहीत. ह्या दैवी घटना काय आहेत? तुमच्या जिवनातील दैवी घटना म्हणजे:
१. दैवी चित्र (योहान ६:४४).
२. दैवी इच्छा (१ तीमथी ३:१)
३. दैवी धारणा. (योहान १६:७-८)
४. दैवी प्रेम. (अनुवाद ६:५)
५. देवाची दैवी दया. ( २ करिंथकरास पत्र ४:१)
६. दैवी विभक्ती. (अनुवाद १०:८)
७. देवाची दैवी इच्छा. ( इफिसकरास पत्र १:९)
८. दैवी पाचारण. (रोमकरास पत्र १:१)
९. दैवी सेवाकार्य. (योना १:१-३)
१०. दैवी हेतू. (नितीसुत्रे १६:४)
११. दैवी दृष्टांत. (प्रेषितांची कृत्ये २६:१९)
१२. दैवी वरदाने प्रदान करणे. (रोमकरास पत्र १:११)
१३. दैवी कृपा. (२ तीमथी १:८-९)
१४. दैवी कार्यक्षेत्र. (रोमकरास पत्र १२:४)
तुमच्या सेवेचे काय करावे हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही ती वाणी ऐकली असे भासावण्याची काहीच गरज नाही. तुम्ही काय करावे हे जाणून घेण्यापूर्वी येशू येऊन तुम्हाला दर्शन देणार आहे अशी वाट पाहण्याचे सिद्ध करण्यात काहीच उपयोग नाही. तुमचे खरे सेवाकार्य काय आहे ह्याप्रती तुम्हाला बर्याच घटना मार्गदर्शन देतील आणि तुम्हाला ते पूर्ण करण्यास मदत करतील.
देवाची रहस्यमय इच्छा, त्याचा हेतू आणि देव तुमच्यावर दया दाखवणे हे तर आयुष्य बदलून टाकणारे अनुभव आहेत जे थेट तुम्हाला सेवाकार्यात चालवतील.
देवाचे प्रेम आणि त्याची दया ह्याला कोणत्याही प्रकारे प्रतिसाद न देता, तुम्ही त्या सेवाकार्यात राहणार नाही. देवाच्या प्रेमाने पौलावर मर्यादा घातली असे तो म्हणाला. तुम्ही कुटुंब, तुमचा देश आणि लोक ह्यापासून विभक्त होणे तर एक महत्वपूर्ण अध्यात्मिक घटना आहे जी तुमच्या जीवनात घडली आहे.ह्या अध्यात्मिक घटनांना व्यवस्थितपणे प्रतिसाद देणे तुम्हाला सेवाकार्य पूर्ण करण्यास मदत करेल.
अध्याय २
तुम्ही ओढले जाता त्या व्यक्तीचे अनुसरण करा
ज्याने मला पाठवले त्या पित्याने आकर्षित केल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही; त्याला शेवटल्या दिवशी मी उठवीन.
योहान ६:४४
तुम्ही ज्या व्यक्तीकडे आकर्षित होता त्याचे अनुसरण करून तुमच्या सेवेचा पूर्ण उपयोग तुम्ही करा! कोणाच्यातरी प्रती ओढले जाणे तर काहीतरी अलौकिक आहे. तुमच्यात देवाचे भय असू द्या आणि देव तुम्हाला कोणाकडेआकर्षित करत आहे त्यासाठी योग्य सन्मान बाळगा. तुम्ही आकर्षित होता त्या व्यक्तीकडे जसे तुम्ही जाता, तेव्हाच तुमच्या सेवेचा तुम्ही पूर्ण उपयोग करता!
१. देवाकडे जर तुम्ही आकर्षित होता, तर तुम्हाला एक अलौकिक अनुभव मिळतो.
देवाकडे आकर्षित होणे तर अलौकिक आहे. पिता तुम्हाला ओढून घेतो. अनेक लोकांना देव आवडत नाही! अनेक लोकांना प्रार्थना करण्यास किंवा उपवास करण्यास आवडत नाही. बर्याच लोकांना पवित्र शास्त्र आवडत नाही. अनेक लोकांना मंडळीला जाणे आवडत नाही. कशाच्या प्रती आकर्षित होणे म्हणजे ओढले जाणे आहे. देव आणि मंडळीच्या प्रती आकर्षित होणे हे तो तुमच्या मनात घालतो!
तुम्ही मंडळीकडे आकर्षित होताना स्वतःला पाहता, ख्रिस्ती गोष्टी आणि देव. रात्रीच्या ठिकाणी क्लबकडे नाही तर मंडळीकडे आकर्षित होत आहात हे तुम्हाला न कळणे देखील खूपच धूर्त आहे.
तुम्ही कशाच्याप्रती ओढले जाता हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.आपल्यातील बरेच लोक विभिन्न गोष्टींकडे आकर्षित होतात. तुम्ही कशाच्याप्रती आकर्षित होता हे जेव्हा तुम्हाला कळते, तेव्हाक तुमचे पाचारण कळून तुम्ही सेवाकार्य पूर्ण करू लागता.
२. तुम्ही जर मनुष्याकडे ओढले गेला तर, तेव्हा देखील तुम्हाला एक अध्यात्मिक अनुभव मिळतो.
कोणाच्यातरी प्रती ओढले जाणे आणि त्याची इच्छा धरणे, ह्यातील फरक काय आहे हे तुम्हाला कळते का? जेव्हा तुम्ही कोणाकडे तरी आकर्षित होता तेव्हा, त्या व्यक्तींकडे खेचले जाता. ती व्यक्ती काय करते आणि बोलते ह्यात तुम्हाला खूपच रस असतो. एक ‘’ओढ’’ असण्यापेक्षा इच्छा तीव्र मत तयार करते.
३. तुम्ही कधी ओढले जाता हे जाणून घेणे कदाचित कठीण असू शकते.
तुम्ही कशाच्या प्रती ओढले जाता हे जाणून घेणे तर सर्वात कठीण अध्यात्मिक अनुभव असतो. ह्याचे कारण म्हणजे जेव्हा तुम्ही देवाकडे आकर्षित होता, तुम्हाला काय होते हे तुम्ही पाहत नाही. तुम्ही स्वतःला मंडळीत, सह्भागीतेत, सभेत आणि बंधूंच्या बरोबर भेटताना पाहावे.
४. पिता ज्या देवाच्या सेवकांना निवडतो त्यांच्याप्रती तुम्ही ओढले जाता.
ज्याने मला पाठवले त्या पित्याने आकर्षित केल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही; त्याला शेवटल्या दिवशी मी उठवीन.
योहान ६:४४
देवाच्या सेवकांच्या प्रती तुम्ही कदाचित ओढले जाता! तुम्ही ज्या लोकांकडून शिकावे अशी देवाची इच्छा असते अशा लोकांकडे तो तुम्हाला आकर्षित करेल. देवाच्या सेवकांचा बरेच लोक द्वेष करतात आणि काही लोकांना ते आवडतात. तोच देवाचा सेवक जो तुम्हाला आश्चर्यचकित करतो तोच इतरांना क्रोधीत करू शकतो.
देवाचा सेवक तुम्हाला बंदिस्त करू शकतो, आणि त्याच वेळेला दुसरे कोणीतरी त्या व्यक्तीला सहन करू शकत नाही. पिता जोवर आणत नाही तोपर्यंत देव पित्याकडे कोणीच येऊ शकत नाही. पिता तुम्हाला अत्यंत धूर्त, न पाहता येणाऱ्या मार्गाने त्याच्या सेवकाकडे आकर्षित करतो. येशूने स्पष्टपणे हे दाखवले की जोवर देव त्या व्यक्तीच्या मनात कार्य करत नाही तोपर्यंत त्याच्याप्रती कोणीच आकर्षित होऊ शकत नाही. सर्वच लोक येशूवर काही प्रेम करत नव्हते. बहुसंख्यक यहुदी लोकांनी येशूला वधस्तंभावर जाण्याची मागणी केली. तो खूपच थोर आहे असे सर्वांनाच वाटले नाही. येशूने आपल्याला ही प्रक्रिया स्पष्ट करून सांगितली तेव्हा तो म्हणाला, ‘’पिता घेऊन येत नाही तोवर कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही.’’ कोणीतरी येशूकडे आकर्षित होणे हे अलौकिक होते म्हणून जी प्रत्येक व्यक्ती त्याच्याकडे येत होती हे येशूला कळत होते.
५. विभिन्न वेळी वेगळ्या लोकांच्याकडे तुम्ही आकर्षित व्हाल.
त्यानंतर दुसर्या दिवशी योहान आपल्या शिष्यांतील दोघांसह पुन्हा उभा असता,
येशूला जाताना न्याहाळून पाहून म्हणाला, हा पाहा, देवाचा कोकरा!
त्याचे हे म्हणणे त्या दोघा शिष्यांनी ऐकले