विश्वासातून माघारी जाणे
()
About this ebook
डाग हेवार्द-मिल्स अनेक पुस्तकांचे लेखक आहेत, त्यात उत्कृष्ठ म्हणजे ‘’प्रामाणीकपणा आणि अप्रामाणीकपणा.’’ दोन हजार मंडळयांचा पंथ ज्याला द लाईटहाउस चापेल आंतरराष्ट्रीय असे म्हंटले जाते त्याचे ते संस्थापक आहेत. डाग हेवार्द-मिल्स, एक आंतरराष्ट्रीय सुवार्तिक, हे आंतरराष्ट्रीय येशूच्या आरोग्याच्या सभा आणि परिषदा ह्यात सेवा करतात. अधिक माहितीसाठी, www.daghewardmills.org ह्या संकेतस्थळाला भेट द्या.
Dag Heward-Mills
Bishop Dag Heward-Mills is a medical doctor by profession and the founder of the United Denominations Originating from the Lighthouse Group of Churches (UD-OLGC). The UD-OLGC comprises over three thousand churches pastored by seasoned ministers, groomed and trained in-house. Bishop Dag Heward-Mills oversees this charismatic group of denominations, which operates in over 90 different countries in Africa, Asia, Europe, the Caribbean, Australia, and North and South America. With a ministry spanning over thirty years, Dag Heward-Mills has authored several books with bestsellers including ‘The Art of Leadership’, ‘Loyalty and Disloyalty’, and ‘The Mega Church’. He is considered to be the largest publishing author in Africa, having had his books translated into over 52 languages with more than 40 million copies in print.
Related to विश्वासातून माघारी जाणे
Related ebooks
गमावणे दुखसहन बलिदान आणि मृत्युमुखी पडणे Rating: 0 out of 5 stars0 ratingsसोपी करण्यात आलेली क्षमाशीलता Rating: 0 out of 5 stars0 ratingsनवीन विश्वासनार्यां साठी अत्यंत महत्वाचे तपशील Rating: 0 out of 5 stars0 ratingsअनागाझो Rating: 0 out of 5 stars0 ratingsआपल्या पाळकीय सेवेला बदला Rating: 5 out of 5 stars5/5मेंढपाळ बनण्याची कला Rating: 3 out of 5 stars3/5त्याला नाव दया ! त्यावर दावा करा ! ते प्राप्त करा ! Rating: 0 out of 5 stars0 ratingsझाड आणि तुमचे सेवाकार्य Rating: 0 out of 5 stars0 ratingsआपले पवित्र शास्त्र वाचा, दररोज प्रार्थना करा Rating: 0 out of 5 stars0 ratingsदुष्ट आत्मे आणि त्यांच्याशी कसा व्यवहार कराल Rating: 5 out of 5 stars5/5शापांना निष्क्रिय कसे करावे Rating: 0 out of 5 stars0 ratingsलायकोस: अदिक्षित लोक आणि सेवाकार्य Rating: 0 out of 5 stars0 ratingsमुली तू हे करू शकतेस Rating: 0 out of 5 stars0 ratingsबोलावलेले पुष्कळ आहेत Rating: 0 out of 5 stars0 ratingsअभिषेकाचे मधुर प्रभाव Rating: 0 out of 5 stars0 ratingsत्यांना सांगा तुम्ही आत्मे जिंकणारा का व्हायला पाहिजे याची १२० कारणे Rating: 0 out of 5 stars0 ratingsतुमचे सेवाकार्य वाढवा Rating: 0 out of 5 stars0 ratingsपवित्र शास्त्राचे पाठांतर करण्यासाठीचे अत्यंत महत्वपूर्ण हस्तपुस्तक Rating: 0 out of 5 stars0 ratingsतुम्ही सामर्थी ख्रिस्ती कसे होऊ शकता Rating: 0 out of 5 stars0 ratingsअशक्तपणा आणि रोग नष्ट करा: अशक्तपणा आणि रोगांचे बळ नष्ट करण्यासाठी शक्तिशाली प्रार्थना Rating: 0 out of 5 stars0 ratingsजे अज्ञानी असतात Rating: 0 out of 5 stars0 ratingsसौंदर्या, प्राणी आणि पाळक Rating: 0 out of 5 stars0 ratingsइतर लोक.... Rating: 0 out of 5 stars0 ratingsअभिषेक पकडून ठेवा Rating: 0 out of 5 stars0 ratingsतुम्हांपैकी एक जण सैतान आहे Rating: 0 out of 5 stars0 ratingsअभिषिक्त आणि त्याचा अभिषेक Rating: 0 out of 5 stars0 ratingsमंडळी रोपण Rating: 0 out of 5 stars0 ratingsअनुसरण करण्याची कला Rating: 0 out of 5 stars0 ratingsनव्याने जन्म होऊन नरक कसा टाळावा Rating: 0 out of 5 stars0 ratingsतुम्ही देवासमवेत दररोज परिणामकारक शांत समय कसा घालवू शकता Rating: 0 out of 5 stars0 ratings
Reviews for विश्वासातून माघारी जाणे
0 ratings0 reviews
Book preview
विश्वासातून माघारी जाणे - Dag Heward-Mills
देवाने यिर्मया संदेष्ट्याला अशा वेळी उभे केले जेव्हा इस्राएल आणि यहूदा यांना बाबेलच्या बंदीवासात नेले जाणार होते. देवाने इस्राएल लोकांना त्यांच्या हृदयाची पतन झालेली अवस्था दर्शविण्यासाठी यिर्मयाचा उपयोग केला.
यिर्मया, तू का रडत आहेस?
यिर्मयाचे पुस्तक विश्वासातून माघारी गेलेल्या अवस्थेचे अनेक वेळा स्पष्ट वर्णन करते. यिर्मया, ज्याला रडणारा संदेष्टा
देखील म्हटले जाते, त्याचे बहुतेक संदेश विश्वासातून माघारी जाणे या विषयावर केंद्रित होतात. तो बऱ्याचदा इस्राएलाशी युद्ध
करत होता आणि त्यांना सतत इशारा देत होता की, त्यांनी पश्चात्ताप करून त्यांच्या वाईट मार्गातून बाजूला व्हावे. या रडणाऱ्या संदेष्ट्याला त्याच्या लोकांच्या हट्टी वृत्तीची काळजी वाटत होती. त्याने वारंवार त्यांना अशी विनंती केली की, आपल्या दुष्ट मार्गापासून फिरा. वाईट करणे थांबवा. पश्चात्ताप करून देवाकडे परत या.
विश्वासातून माघारी जाणे म्हणजे काय हे त्याने त्यांना विविध प्रकारे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. तरीही इस्राएल आणि यहूदामधील लोकांनी बदलण्यास नकार दिला.
बऱ्याच वर्षांपूर्वी मला अनुभवातून शिकायला मिळाले की, विश्वासातून माघारी जाण्याची तुलना संकेत फलक नसलेल्या एखाद्या रस्त्यावरून चालण्यासारखे आहे. आपल्या ख्रिस्ती चालण्यात तुम्ही विश्वासातून माघारी जात आहात अशी चेतावणी देण्यासाठी कोणतेही संकेत फलक नाहीत. नरक आणि नाश - २०० मीटर पुढे आहे, असे लिहिलेला संकेत फलक या रस्त्यावर नाही! विश्वासातून माघारी जाणे हळूहळू होते, जोपर्यंत तुम्ही तेथे पोहचत नाही जेथे जाण्याची तुम्ही कधीच अपेक्षा केली नव्हती. हळूहळू पण निश्चितपणे, तुम्ही तेथे घसरत जाल.
विश्वासातून माघारी जाणे वास्तविक आहे आणि यिर्मयाने वर्णन केलेल्या माघारी जाण्याच्या विविध प्रकारांचा अभ्यास करून त्याचे विश्लेषण केले जाऊ शकते. या संदेष्ट्याने वास्तविक जीवनाच्या परिस्थितीचा उपयोग या अतिशय सामान्य आध्यात्मिक अभूतपूर्व घटनांचे वर्णन करण्यासाठी केला. ही ख्रिस्ती जगातील एक सामान्य घटना आहे
पवित्रशास्त्र म्हणते,
... बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडके आहेत.
मत्तय २०:१६
दुसऱ्या शब्दांत, अनेकजण ख्रिस्ताबरोबर सुरूवात करतात परंतु असे असूनही बरेच लोक पतन पावतात. पवित्रशास्त्र असेही म्हणते की,
... तथापि जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल.
मत्तय १०:२२
ख्रिस्ताकडे येणारे बरेच जण नंतर पतन पावतात.
तुम्हीदेखील विश्वासातून मागे जाऊ शकता!
काही लोक या विषयाची निंदा करतील आणि म्हणतील, मी स्वतःला विश्वासातून मागे जाताना पाहत नाही.
हीच वृत्ती तुम्हाला दाखवते की, विश्वासातून माघारी जाण्याकडे तुमचा कल आहे. पवित्रशास्त्र १ करिंथ. १०:१२ मध्ये सावधानतेचा इशारा देते: म्हणून आपण उभे आहोत असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावे.
हे पुस्तक ख्रिस्ती शर्यतीत टिकून राहण्याची शक्ती विकसित करण्यासाठी तुम्हांला मदत करेल. तुम्हांला जितके अधिक माहित होईल, तितके अधिक तुम्ही सुरक्षित राहाल - आणि टिकून राहणारे अधिक सामर्थ्य तुम्हाला मिळेल. पवित्रशास्त्र म्हणते,
... त्याचे विचार आपल्याला कळत नाहीत असे नाही.
२ करिंथ. २:११
या पुस्तकात ज्या अध्यापनाचा समावेश आहे, ती शिकवण अज्ञानांच्या पिडेला दूर करेल. लक्षात ठेवा जे वाचत नाहीत ते जे वाचू शकत नाहीत त्यांच्यापेक्षा अधिक चांगले नाहीत. दुसऱ्या शब्दात, ज्ञानाचा शोध घेण्यास नकार देणारे, ज्यांच्यात खरोखरच तसे करण्याची क्षमता नाही त्यांच्यापेक्षा काही चांगले नाहीत.
पुढील अध्यायात, मी तुम्हाला भिन्न मार्ग दाखवणार आहे ज्याद्वारे तुम्ही विश्वासातून माघारी जाणे या विषयाकडे पाहू शकता.
अध्याय २
विश्वासातून माघारी जाणे याविषयी पवित्रशास्त्राचे वर्णन
झरा सोडून फुटके हौद तयार करणे
कारण माझ्या लोकांनी दुहेरी दुष्कर्म केले; मी जो जिवंत पाण्याचा झरा, त्या मला त्यांनी सोडले आणि ज्यांत पाणी राहणार नाही असे फुटके हौद आपल्यासाठी खोदून तयार केले.
यिर्मया २:१३
मी वैद्यकीय विद्यार्थी होतो, तेव्हा मला दोन आठवड्यांसाठी घाना देशातील डन्फ या गावात एका कामाच्या ठिकाणी पाठविण्यात आले होते. एकदा, कामासाठी दौऱ्यावर असताना, आम्ही एका दुर्गम खेड्यात आलो जिथे नळाचे किंवा वाहते पाणी नव्हते. त्या गावात पाण्याचे नळ नसल्याने, जमिनीत एक मोठी विहीर खोदली होती आणि पावसाचे पाणी तेथे एकत्रित गोळा होत होते; अनेकदा, हे पाणी गलिच्छ व तपकिरी असायचे.
त्यांनी घाण तपकिरी पाणी पिले!
गावातले लोक त्या विहिरीत आंघोळ करत, शौच करत आणि मूत्र विसर्जन करत. त्याच वेळी ते त्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी आणि स्वयंपाक करण्यासाठी करत. हे स्पष्ट आहे की या पाण्याने त्यांना विविध रोग आणि आजार दिले.
पवित्रशास्त्रात, विश्वासातून माघारी जाणाऱ्या लोकांची तुलना अशा लोकांशी केली आहे जे लोक वाहत्या पाण्याचा उपभोग घेऊ शकतात, पण ते त्या पाण्याच्या बदली घाण वास येणारे पाणी घेतात – मी त्या गावात पाहिले अगदी तसेच.
मला खात्री आहे की तुम्ही विचार कराल की, गोड, ताजे, संक्रमण मुक्त पाणी सोडून का कोणी आजाराने ग्रस्त आणि घाण असलेले पाणी घेईल. असे विश्वासणारे आहेत ज्यांच्याकडे पवित्र आणि भक्तिमान जीवन जगण्याची संधी आहे. तथापि, त्यांनी पापी आणि सैतान-नियंत्रित जीवन जगण्यास ते जीवन नाकारले आहे.
देवाने तुम्हाला गलिच्छ तपकिरी पाण्याला पर्याय दिला आहे. देव तुम्हाला सांगत आहे की, जेव्हा तुम्ही विश्वासातून माघारी जाता तेव्हा तुम्ही अशा काहीतरी भयंकर गोष्टीकडे परत जात आहात जी शेवटी तुम्हाला संपवून टाकेल. तो तुम्हांला सांगत आहे की, ते घाण व गढूळ पाणी पिणे यासारखी विचित्र गोष्ट करू नका.
विजातीय रानटी द्राक्षलता बनणे
... ती तू माझ्यासमोर विजातीय हीन जातीची द्राक्षलता अशी कशी झालीस?
यिर्मया २:२१
विश्वासातून माघारी जाण्याचे पवित्र शास्त्रातील पुढील उदाहरण हे एका चांगल्या रोपट्याचे आहे ज्याचे रूपांतर एका काटेरी आणि विचित्र द्राक्षवेलीत झाले.
येथे, देव आपल्याला दाखवतो की शेतकऱ्याने केलेल्या लागवडीपासून त्याला चांगली पिकाची अपेक्षा होती पण तिचे रूपांतर काटेरी आणि निरुपयोगी तणामध्ये झाले होते. तुम्ही, विश्वासणारे, प्रभूचे ते सुंदर रोपटे आहात. या पृथ्वीवर तुम्ही स्वतःला काटेरी आणि निरुपयोगी झुडूप का होऊ देत आहात? जेव्हा तुम्ही विश्वासातून माघारी जाता तेव्हा देव तुमच्याकडे असेच पाहतो.
इस्राएल लोकांशी देवाची समस्या अशी होती की, त्याने फार प्रेम, काळजी, कोमलता आणि वेळ त्यांच्या जीवनात गुंतविली होती. तरीही ते अवज्ञाकारी, कठोर आणि दुष्ट लोक बनले होते. तुम्ही स्वतःला देवासमोर निरुपयोगी प्राणी होऊ देणार आहात का? उत्तर निश्चितपणे नाही!
असे असले पाहिजे.
रानटी सांडणी बनणे
... तू चपळ, तरुण सांडणीसारखी इकडून तिकडे धावत आहेस.
यिर्मया २:२३
विश्वासातून माघारी जाणाऱ्या ख्रिस्ती व्यक्तीचे वर्णन इकडून तिकडे धावत जाणाऱ्या चपळ तरुण सांडणी सोबत केले आहे. सांडणी हे कुबड असलेल्या ऊंट मादीचे नाव आहे. तो एक रानटी चपळ प्राणी आहे, जो कुठेही भटकतो.
विश्वासातून माघारी जाणाऱ्या व्यक्तीचे हृदय एखाद्या जंगली सांडणीप्रमाणे अनियंत्रित असते. ते कशाच्याही नियंत्रणाखाली नसते. हे मोकळे आणि रानटी असते. मला आठवते की, मी काही वर्षांपूर्वी विश्वासातून माघारी गेलेल्या ख्रिस्ती लोकांना भेटण्यासाठी लंडनला गेलो होतो.
माझा मित्र जंगली झाला होता
हा व्यक्ती मुक्त आणि जंगली झाला या शब्दात मी त्याचे सर्वोत्तम वर्णन करु शकतो. मी त्याला देवाकडे परत आणण्याचा प्रयत्न करीत होतो. त्याचे घर शोधण्यासाठी मला बराच वेळ लागला. अखेरीस मध्यरात्रीनंतर मी त्याच्या फ्लॅटमध्ये पोहोचलो. तो मला पाहून आश्चर्यचकित झाला आणि त्याने माझे त्याच्या घरात स्वागत केले. आम्ही बोलत असताना त्याच्या लक्षात आले की, मी तेथे कशासाठी आलो होतो. एके समयी परिपक्व असलेला पण विश्वासातून माघारी गेलेल्या या ख्रिस्ती व्यक्तीला मी उद्धृत करत असलेली सर्व शास्त्रवचने माहित होती.
मी बोलत असताना त्याने मला मध्येच थांबवले आणि म्हणाला, ऐका, तुम्ही काय सांगणार आहात ते मला ठाऊक आहे आणि आज रात्री जी शास्त्रवचने मला सांगण्यासाठी तुम्ही सज्ज होऊन आलात ती सर्व मला ठाऊक आहेत. परंतु मला तुम्हांला सांगायचे आहे की, मला या गोष्टींची पर्वा नाही.
असे म्हणून त्याने आपली सिगारेट बाहेर काढली आणि माझ्या समोरच धूम्रपान सुरु केले. तो म्हणाला, तुम्ही मला धूम्रपान करताना पहावे असे मी इच्छितो. कारण मी कोणत्याही बंधनाखाली नाही.
मग त्याने एक अल्बम काढला आणि त्याने त्याच्या मैत्रिणीसोबत काढलेली काही छायाचित्रे मला दाखवली. यापैकी काही छायाचित्रे तार्किक आणि अश्लील होती.
तो म्हणाला, मी जसा आहे तसे तुम्ही मला पाहावे अशी माझी इच्छा आहे. मी आता असा आहे. हेच मी करतोय आणि याबद्दल कुणीही काही करू शकत नाही!
पुन्हा एकदा तो असा मुद्दा मांडत होता की, त्याला जे काही हवे होते ते तो करू शकत होता आणि कोणालाही त्याला नियंत्रित करता आले नाही. तुम्ही पहा, विश्वासातून माघारी जाणारे