अभिषिक्त आणि त्याचा अभिषेक
()
About this ebook
अभिषेकाचा खजिना अभिषिक्तामध्ये आहे. जो मनुष्य अभिषिक्त आहे त्याच्यापासून अभिषेक वेगळा करणे अशक्य आहे. अभिषेक हा देवाच्या माणसामध्ये आहे! अभिषेक हा देवाच्या माणसाबरोबर आहे! अभिषेक हा देवाच्या माणसावर आहे! डाग हेवर्ड मिल्स लिखित हे नवीन पुस्तक अभिषेक प्राप्त करणा-यांची अंत:करणे रोमांचित करील.
Dag Heward-Mills
Bishop Dag Heward-Mills is a medical doctor by profession and the founder of the United Denominations Originating from the Lighthouse Group of Churches (UD-OLGC). The UD-OLGC comprises over three thousand churches pastored by seasoned ministers, groomed and trained in-house. Bishop Dag Heward-Mills oversees this charismatic group of denominations, which operates in over 90 different countries in Africa, Asia, Europe, the Caribbean, Australia, and North and South America. With a ministry spanning over thirty years, Dag Heward-Mills has authored several books with bestsellers including ‘The Art of Leadership’, ‘Loyalty and Disloyalty’, and ‘The Mega Church’. He is considered to be the largest publishing author in Africa, having had his books translated into over 52 languages with more than 40 million copies in print.
Related to अभिषिक्त आणि त्याचा अभिषेक
Related ebooks
अभिषेक पकडून ठेवा Rating: 0 out of 5 stars0 ratingsअभिषेकाचे मधुर प्रभाव Rating: 0 out of 5 stars0 ratingsत्याला नाव दया ! त्यावर दावा करा ! ते प्राप्त करा ! Rating: 0 out of 5 stars0 ratingsत्यांना सांगा तुम्ही आत्मे जिंकणारा का व्हायला पाहिजे याची १२० कारणे Rating: 0 out of 5 stars0 ratingsतुमचे सेवाकार्य वाढवा Rating: 0 out of 5 stars0 ratingsतुम्ही सामर्थी ख्रिस्ती कसे होऊ शकता Rating: 0 out of 5 stars0 ratingsआपले पवित्र शास्त्र वाचा, दररोज प्रार्थना करा Rating: 0 out of 5 stars0 ratingsगमावणे दुखसहन बलिदान आणि मृत्युमुखी पडणे Rating: 0 out of 5 stars0 ratingsझाड आणि तुमचे सेवाकार्य Rating: 0 out of 5 stars0 ratingsलायकोस: अदिक्षित लोक आणि सेवाकार्य Rating: 0 out of 5 stars0 ratingsशापांना निष्क्रिय कसे करावे Rating: 0 out of 5 stars0 ratingsविश्वासातून माघारी जाणे Rating: 0 out of 5 stars0 ratingsप्रतिक्रमण Rating: 0 out of 5 stars0 ratingsअशक्तपणा आणि रोग नष्ट करा: अशक्तपणा आणि रोगांचे बळ नष्ट करण्यासाठी शक्तिशाली प्रार्थना Rating: 0 out of 5 stars0 ratingsचमत्कार Rating: 0 out of 5 stars0 ratingsप्रार्थना कशी करावी Rating: 0 out of 5 stars0 ratingsनवीन विश्वासनार्यां साठी अत्यंत महत्वाचे तपशील Rating: 0 out of 5 stars0 ratingsतुमच्या सेवाकार्याचा संपूर्ण पुरावा तुम्ही कसा तयार करावा Rating: 0 out of 5 stars0 ratingsअहिंसा Rating: 0 out of 5 stars0 ratingsअनागाझो Rating: 0 out of 5 stars0 ratingsआपल्या पाळकीय सेवेला बदला Rating: 5 out of 5 stars5/5अनुसरण करण्याची कला Rating: 0 out of 5 stars0 ratingsबोलावलेले पुष्कळ आहेत Rating: 0 out of 5 stars0 ratingsसोपी करण्यात आलेली क्षमाशीलता Rating: 0 out of 5 stars0 ratingsपवित्र शास्त्राचे पाठांतर करण्यासाठीचे अत्यंत महत्वपूर्ण हस्तपुस्तक Rating: 0 out of 5 stars0 ratingsदुष्ट आत्मे आणि त्यांच्याशी कसा व्यवहार कराल Rating: 5 out of 5 stars5/5आत्मसाक्षात्कार प्राप्तीचे सरळ आणि अचूक विज्ञान Rating: 0 out of 5 stars0 ratingsमी कोण आहे Rating: 4 out of 5 stars4/5मंडळी रोपण Rating: 0 out of 5 stars0 ratingsकर्माचे विज्ञान Rating: 5 out of 5 stars5/5
Reviews for अभिषिक्त आणि त्याचा अभिषेक
0 ratings0 reviews
Book preview
अभिषिक्त आणि त्याचा अभिषेक - Dag Heward-Mills
नासोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला; तो सत्कर्मे करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला; कारण देव त्याच्याबरोबर होता.
प्रेषितांची कृत्यें १०:३८
अभिषेक हा पवित्र आत्मा आहे. पवित्र आत्म्या विषयी प्रत्येक शिकवण जी तुम्ही ऐकता ती अभिषेकाविषयीची शिकवण असते.
अभिषेक
हा शब्द क्रियापद आणि नाम सुद्धा आहे. अभिषेक
ह्याचा अर्थ एखाद्या व्यक्तीला अभिषेक करण्यासाठी वापरला जाणारा पदार्थ असाहि होऊ शकतो; उदाहरणार्थ अभिषेकाचे तेल.
अभिषेकाचा अर्थ एखाद्या व्यक्तीवर तेल टाकण्याचे कार्य असा देखील होऊ शकतो.
मी जेव्हा अभिषेकाविषयी बोलतो, मी पवित्र आत्मा व्यक्ती बद्दल बोलतो जो तुम्हांला देवाचे काम करण्यासाठी दिला गेला आहे. अभिषेकास पाहाण्यासाठी अभिषिक्ताच्या पलीकडे जाणे महत्वाचे आहे. पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने अभिषिक्त वेढलेला असतो,
नासोरी येशू ख्रिस्त हा सत्कर्में करीत फिरला कारण तो पवित्र आत्मा आणि सामर्थ्याचा त्याला अभिषेक करण्यांत आला होता. ओलिव्ह तेल, इंजिन तेल, खोब-याचे तेल, किंवा व्हॅसलीन ह्यांनी येशूला अभिषेक केला जाऊ शकला असता. यापैकी कोणत्याहि गोष्टीने त्याला अभिषेक करण्यांत आला असता तर ओलिव्ह तेल, इंजिन तेल, खोब-याचे तेल, किंवा व्हॅसलीन हे अभिषेकाचे पदार्थ आहेत असे आपण सुरक्षितपणे म्हटले असते. परंतु पवित्र आत्मा आणि सामर्थ्य ह्यांनी येशू ख्रिस्ताला अभिषेक करण्यांत आला होता. आणि म्हणून ज्यांनी येशू ख्रिस्ताला अभिषेक करण्यांत आला होता पवित्र आत्मा होता. ज्या व्यक्तीला देवाने अभिषेक केला आहे त्या व्यक्तीवर रहस्यमय पवित्र आत्मा राहाण्यासाठी येतो.
एखाद्या व्यक्तीचा अभिषेक झाल्यावर, सर्वसमर्थ देव त्या व्यक्तीच्या वर, आंत, किंवा बरोबर विशेष प्रकारे राहण्यास येतो. हे त्या व्यक्तीला अभिषिक्त आणि शक्तिशाली बनवते. जेव्हा तुम्ही एखाद्या अभिषिक्त व्यक्तीशी व्यवहार करता तेव्हा प्रत्यक्षांत तुम्ही देवाशी व्यवहार करता. जेव्हा तुम्ही एखाद्या अभिषिक्त व्यक्तीशी व्यवहार करता तेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याशी व्यवहार करता.
आणि म्हणून जे लोक अभिषिक्त आणि त्याच्या अभिषेकाला नीट हाताळत न्हाईत त्यांना अशा गंभीर प्रतिक्रिया प्राप्त होतात. ते मनुष्यांना नव्हे तर देवाला नीट हाताळीत नाहीत. जेव्हा पेत्र ज्याला प्रेषित होण्यासाठी अभिषेक करण्यांत आला होता, त्याच्याशी हनन्या व सप्पिराने लबाडी केली, आणि ते झटपट मेले. ही एक गंभीर प्रतिक्रिया होती जिणे मंडळीच्या इतर सदस्यांना भयभीत केले. परंतु हनन्या आणि सप्पिराने केलेल्या चुकीस पेत्राने स्पष्ट करून सांगितले. तो म्हणाला, "तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी व जमिनीच्या किंमतीतून कांही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन कां भरविले आहे? ती होती तोवर तुझी स्वत:ची व विकल्यावर तुह्या स्वाधीन नव्हती काय? हे करण्याचे तू आपल्या मनांत का आणलेस? तू मनुष्याशी नव्हे तर देवाशी लबाडी केली आहेस. हे शब्द ऐकताच हनन्याने खाली पडून प्राण सोडला आणि हे ऐकणा-या सर्वांना मोठे भय वाटले (प्रेषितांची कृत्यें ५:३-५).
हे पाहा हनन्या आणि सप्पिराने प्रत्यक्षांत पवित्र आत्म्याशी लबाडी केली होती. ते पेत्राशी नव्हे तर पवित्र आत्म्याशी लबाडी करीत होते आणि त्यामुळे त्यांना कठोर प्रतिसाद मिळाला होता. अभिषिक्त लोकांशी व्यवहार करीत असतांना काळजीपूर्वक करा. त्यांच्यावर असलेल्या अभिषेकाच्या महानतेस तुम्ही कमी लेखले आणि गैरसमज करून घेतला म्हणून तुम्ही तुमचे जीवन आणि सेवाकार्य अल्प करू शकता.
तुम्ही विचारू शकता, "आज अनेक लोक पाळकांशी लबाडी करतात आणि झटपट का मरत नाहीत? हे ह्यामुळे की ते अभिषिक्त नाहीत? ह्याचे उत्तर सोपे आहे. वेगवेगळ्या वेळी पवित्र आत्म्याची विविध प्रकारची प्रकटी करणे आहेत. पेत्राच्या सेवाकार्याच्या दरम्यान सुद्धा, लबाडी केल्याबद्दल कोणीही मेले नव्हते. एका विशिष्ट प्रकारे देवाचे सामर्थ्य केव्हा प्रकट होईल हे तुम्ही कधीही कधीह कधीहि सांगू शकणार नाही. पवित्र आत्म्याशी लबाडी केल्यामुळे अनेक लोक मेले असतील अशी माझी खात्री आहे. तो मृत्यू त्वरित नसू शकेल परंतु मृत्यू हा शेवटी मृत्यूच आहे.
अध्याय २
अभिषेक नेमका कोठे आहे?
अभिषिक्ताशी अभिषेकाचा खजाना संलग्न असतो. अभिषेकाला मनुष्यापासून वेगळे करू शकत नाही. अभिषेक हा देवाच्या मनुष्याच्या आंत, त्याच्याबरोबर, किंवा त्याच्यावर असतो.
जी गोष्ट बरे करणे, यश, सुटका आणि जीवनांत प्रगती घेउन येईल आज, तुम्ही आणि मी अशा गोष्टीच्या शोधांत आहोत. हा अभिषेक आहे! हा अभिषेकच जो जू ला मोडून टाकतो.
तर मग अभिषेक हा नेमका कोठे आहे? वेस्ट हिल्स मॉलमध्ये आपल्याला अभिषेक मिळू शकतो का? वेस्ट गेट मॉलमध्ये आपल्याला अभिषेक मिळू शकतो का? ऑफिसमध्ये आपल्याला अभिषेक मिळू शकतो का? विमानतळावर आपल्याला अभिषेक मिळू शकतो का? दुकानांत आपल्याला अभिषेक मिळू शकतो का? मुळीच नाही, अभिषेक हा ह्या कोणत्याहि ठिकाणांमध्ये नाही.
अभिषिक्त मनुष्याच्या आत (व्यक्तीमध्ये) अभिषेक मिळतो!
अभिषिक्त मनुष्याच्या बरोबर अभिषेक मिळतो!
अभिषिक्त मनुष्याचं वर अभिषेक मिळतो!
ज्याला देवाने अभिषिक्त केले आहे त्या मनुष्यापासून अभिषेक वेगळा होत नाही.
कोणाला सामर्थ्य आहे: अभिषेकाला किंवा अभिषिक्ताला?
ज्याअर्थी अभिषेकच वास्तविकरित्या जू ला मोडतो, त्याअर्थी अभिषेकाला शोधून काढणे महत्वाचे आहे. अनेक वर्षांपूर्वी, लोकांनी शोधून काढले की संत्री संक्रमित रोग बरे करू शकतात. कांही काळानंतर विज्ञान पुढे गेले आणि त्याने संत्र्यामध्ये असलेल्या प्रत्यक्षांत बरे करण्याच्या घटकाला शोधून काढले. त्यांनी जीवनसत्व सी (व्हिटॅमिन सी) शोधून काढले! आज, अनेक लोक नुसते व्हिटामिन सीच्या गोळ्या खातात. बरे करण्याच्या रहस्याचे प्रकटीकरण त्यांच्याजवळ आहे.
तशाच प्रकारे, अभिषिक माणसांमध्ये चमत्कारांना करण्याचा घटक आहे आणि तो घटक म्हणजे अभिषेक होय. दुर्दैवाने, ज्याप्रकारे संत्र्यांमधून व्हिटामिन सी ला वेगळे केले गेले त्याप्रमाणे अभिषिक मनुष्यामधून अभिषेकाला वेगळे करण्याची कोणतीहि रासायानिक प्रक्रिया उपलब्ध नाही. तुम्ही जर अभिषेकामध्ये प्रवेश प्राप्त करू इच्छिता तर तुम्हांला अभिषिक्त मनुष्याला हाताळावे लागेल. अभिषिक्त मनुष्याला भेटल्याशिवाय तुम्ही अभिषेक प्राप्त करू शकता अशा बाटल्यांमध्ये प्रत्यक्ष अभिषेक भरून देणारी कोणतीही प्रयोगशाळा किंवा कारखाना नाही.
देवाने काळा मनुष्य, गोरा मनुष्य, शिक्षित मनुष्य, किंवा मूर्थ मनुष्य ह्यासाठी निवडला आहे की तो त्याच्यावर त्याचा अभिषेक ठेवू शकतो. तुम्हांला अशा मनुष्याकडे जाण्याची आवश्यकता आहे कारण त्याच्यामध्ये अभिषेक असून तो अभिषेकांत आचरण करतो. अभिषिक्त आणि अभिषेक ह्यामधील वेगळेपणाची ही कमतरता आहे जी गर्विष्ठ ख्रिस्ती लोकांचा नाश आहे. देवाने माझा उपयोग करून घ्यावा अशी माझी इच्छा आहे परंतु अभिषेक प्राप्त करण्यासाठी त्याच्या अभिषिक्ताशी मी संबंध ठेवू इच्छित नाही.
तीन ठिकाणी अभिषेक
१. अभिषेक अभिषिक्त व्यक्तीसोबत असतो.
जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखीत नाही; तुम्ही त्याला ओलाखतां, कारण तो तुम्हांबरोबर राहतो व तुम्हांमध्ये वस्ती करील.
योहान १४:१७
२. अभिषिक्त व्यक्तीने आत्म्याला धारण केलेले असते.
परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दीनांस सुवार्ता संगण्यांस त्याने मला अभिषेक केला; त्याने मला पाठविले आहे, ते अशासाठी की, धरून नेलेल्यांची सुटका व अंधळयांस पुन्हा दृष्टीचा लाभ ह्यांची घोषणा करावी, ठेचले जात आहेत त्यांस सोडवून पाठवावे;
लूक ४:१८
३. अभिषिक्त पवित्र आत्म्याला अंत:करणांत बाळगून असतो.
तुम्हांविषयी म्हणावयाचे तर त्याच्याकडून तुमच जो अभिषेक झाला तो तुम्हांमध्ये राहतो, तेव्हा तुम्हांला कोणी शिकविण्याची गरज नाही, त्याचा अभिषेक-----तो सत्य आहे, खोटा नाही-----तुम्हांला सर्व गोष्टींविषयी शिकवितो त्याप्रमाणे व त्याने तुम्हांला शिकविल्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये राहा.
योहानाचे पहिले पत्र २:२७
पवित्र आत्म्याचा अभिषेक एकतर व्यक्तीच्या आंत, बरोबर, किंवा त्याच्यावर असतो. अभिषेकाचे नेमके तेच स्थान आहे. आणि म्हणून एक अभिषिक्त मनुष्य तुमच्यासाठी महत्वपूर्ण व्यक्ती बनतो. तुम्हांला ज्या गोष्टीची आवश्यकता आहे तिचा तो वाहक आहे. तो स्वत: कमकुवत, निर्बल, निरुपयोगी आणि मानव आहे. परंतु त्याला त्याच्या बरोबर, आंत, किंवा त्याच्यावर आत्म्याचा एक भाग घेऊन जाण्यासाठी निवडले आहे. अभिषेक हा व्यक्तीशी इतका सलंग्न असतो, तो त्या व्यक्तीचा इतका घनिष्ठ भाग असतो की त्या व्यक्तीला स्वत: एक प्रकारचे सामर्थ्य आहे अशा विचारांत आपण ब-याचदा फसून जातो.
अभिषिक्ताला हाताळण्याची तुमची क्षमता आणि अभिषक्त व्यक्तीशी तुमचे संबंध हे अभिषेक प्राप्त करण्याचे निश्चित करील. हे लक्षांत ठेवा की तुम्हांला अभिषेकाची आवश्यकता आहे. एका चंबूमध्ये तुम्हांला संत्र्याचा रस पाहिजे अशी कल्पना करा. तुम्हांला सत्र्याचा रस पाहीजेय परंतु तुम्हांला त्या चंबूस काळजीपूर्वक हाताळण्याची आवश्यकता आहे कारण संत्र्याच्या रसाला सांभाळून ठेवणारा चंबू आहे
अभिषिक्त व्यक्ती आणि त्याच्या अभिषेकाचा जेव्हा विषय निघतो तेव्हा अनेक लोक आध्यात्मिक चूक करतात. त्यांना अभिषेक पाहिजे असतो परंतु ते अभिषिक्त व्यक्तीशी कसल्याच प्रकारचा संबंध ठेवू इच्छित नाहीत. अभिषिक्त मनुष्याच्याप्रती त्यांचे वर्तन त्यांना त्याच्या अभिषेकापासून तोडते आणि त्यांना अध:पतनाच्या मार्गाकडे घेऊन जाते. देव अनेकदा अद्भुत लोकांना अभिषेक करतो आणि क्षमता अद्भुत, असामान्य, किंवा विलक्षण व्यक्तीमत्वें ह्यांच्याशी तुमची संबंध जोडण्याची क्षमता ह्या सर्व गोष्टीं तुम्हांला अभिषेकाशी जोडू शकतात.
स्तोत्रसंहिता ८९ मध्ये, ज्या अभिषिक्तावर अभिषेक आहे त्याला नीट न हाताळण्याच्या धोक्याबद्दल तुम्ही शिकू शकता. देवाने म्हटले, माझा सेवक दावीद मला मिळाला आहे; मी आपल्या पवित्र तेलाने त्याला अभिषेक केला आहे.
त्याने दावीदाला अभिषेक केल्याचे जाहीर केल्यानंतर त्याने म्हटले, माझा भूजहि त्याला बलवान करील.
कारण दावीदाला अभिषेक केला गेला होता आणि तो शक्तिशाली आणि अपराजित होता. दुष्टाचा पुत्र त्याला