Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

सौंदर्या, प्राणी आणि पाळक
सौंदर्या, प्राणी आणि पाळक
सौंदर्या, प्राणी आणि पाळक
Ebook556 pages3 hours

सौंदर्या, प्राणी आणि पाळक

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

डाग हेवार्द-मिल्स अनेक पुस्तकांचे लेखक आहेत, त्यात उत्कृष्ठ म्हणजे ‘’प्रामाणीकपणा आणि अप्रामाणीकपणा.’’ दोन हजार मंडळयांचा पंथ ज्याला द लाईटहाउस चापेल आंतरराष्ट्रीय असे म्हंटले जाते त्याचे ते संस्थापक आहेत. डाग हेवार्द-मिल्स, एक आंतरराष्ट्रीय सुवार्तिक, हे आंतरराष्ट्रीय येशूच्या आरोग्याच्या सभा आणि परिषदा ह्यात सेवा करतात. अधिक माहितीसाठी, www.daghewardmills.org ह्या संकेतस्थळाला भेट द्या.

Languageमराठी
Release dateJun 20, 2018
ISBN9781641354639
सौंदर्या, प्राणी आणि पाळक
Author

Dag Heward-Mills

Bishop Dag Heward-Mills is a medical doctor by profession and the founder of the United Denominations Originating from the Lighthouse Group of Churches (UD-OLGC). The UD-OLGC comprises over three thousand churches pastored by seasoned ministers, groomed and trained in-house. Bishop Dag Heward-Mills oversees this charismatic group of denominations, which operates in over 90 different countries in Africa, Asia, Europe, the Caribbean, Australia, and North and South America. With a ministry spanning over thirty years, Dag Heward-Mills has authored several books with bestsellers including ‘The Art of Leadership’, ‘Loyalty and Disloyalty’, and ‘The Mega Church’. He is considered to be the largest publishing author in Africa, having had his books translated into over 52 languages with more than 40 million copies in print.

Related to सौंदर्या, प्राणी आणि पाळक

Related ebooks

Reviews for सौंदर्या, प्राणी आणि पाळक

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    सौंदर्या, प्राणी आणि पाळक - Dag Heward-Mills

    चेतावनी: सेवकाचे विवाह सर्वसाधारण विवाहांपेक्षा वेगळे असतात

    चेतावनीः सेवेतील विवाहात सत्ता बदलाचे सामर्थ्याचा समतोल

    चेतावनीः पवित्र शास्त्रातून चेतावनी

    चेतावनी: इतिहासातील चेतावनी

    चेतावनीः शलमोनाच्या भयप्रद चेतावन्या

    चेतावनीः स्त्रीयांचा शस्त्र म्हणून उपयोग केला जावू शकतो

    चेतावनीः काही लोक सैतानाशी विवाहित असतात

    चेतावनीः पत्नींना उंच करण्याचा चूकी बद्दल सावध असा

    चेतावनीः टोपली मध्ये स्त्री आहे

    भाग 2: विवाहाचे प्रकार

    पाळक परिपूर्णतेचे चित्र का रंगवितात

    श्रेणी 1, श्रेणी 2, श्रेणी 3 विवाह

    समर्पित पती (ए 1)

    स्वतःची काळजी घे पती (एक्स 5)

    भाग 3: विवाहाचे जनावरं

    चांगल्या विवाहाच्या अधोतीच्या अवस्था

    परिपूर्ण ढोंग्या बरोबर विवाहित असणे म्हणजे काय.

    शांत सुंदरते बरोबर विवाहित असणे म्हणजे काय

    जंगली मांजरी बरोबर विवाहित असणे म्हणजे काय

    ईजबेली बरोबर विवाहित असणे म्हणजे काय

    एका कमजोर कामक-या बरोबर विवाहित असणे म्हणजे काय?.

    अप्रेरित अलैगिंक व्यक्ति बरोबर विवाहित असणे म्हणजे काय

    भांडखोर राणीसोबत विवाह करणे म्हणजे काय

    सतत दोषारोपण करणा-या स्त्रिसोबत लग्न करणे म्हणजे काय?

    हेका न सोडता आरोप करणारीसोबत लग्न करणे म्हणजे काय?

    प्रेम न करणा-या वयस्कर व्यक्तीसोबत विवाह करणे म्हणजे काय?

    काळजी न घेणा-या स्वावलंबी व्यक्तीसोबत विवाह करणे म्हणजे काय?

    घटस्फोट प्रवण सौंदर्यवतीसोबत लग्न करणे म्हणजे काय

    रूग्णासोबत विवाह करणे म्हणजे काय?

    सर्व समाविष्ट स्त्रीसोबत विवाह करणे म्हणजे काय.

    भाग 4: सेवा आणि विवाहावर विजय मिळविणे

    निभावण्यासाठी संघर्ष करण्यासाठी तुमच्या विवाहात विजयी होणे

    पाच निश्चीत हल्ले रोखून वैवाहिक जीवनात विजयी व्हा

    घटस्फोट शक्यतेचा प्रतिकार करून वैवाहिक जीवनात विजयी व्हा

    कठीण निर्णय घेऊन विवाहात विजयी व्हा

    मर्दखयाच्या सामर्थ्याने आपल्या विवाहात मात

    नामीच्या बुद्धीने आपल्या विवाहावर वियज मिळवा

    वेगळे होण्याद्वारे विवाहांवर विजय मिळवा

    स्विकृती व सहन करने या द्वारे विवाहावर विजय मिळवा

    पौलाची बुद्धिमत्तावापरून आपल्या विवाहामध्ये विजयी व्हा

    आपल्या विवाहसाठी भविष्य प्राप्त करून आपल्या विवाहावर विजय प्राप्त करा.

    काही पाळकांनी घटस्फोट का केला आहे?

    समर्पण

    माझी पत्नी अॅडीलेड, हे पुस्तक मी तुला समर्पित करतो!

    तू माझे पहिले व एकमेव प्रेम आहेस!

    जर मी पुन्हा जीवन जगलो तर मी तुझाच निवड करेन!

    जेव्हा मी आजू बाजूला पाहतो तेव्हा मला तुझ्या पेक्षा चांगली कोणी सापडत नाही!

    तुझ्या मृदू व आत्मिकतेच्या अद्वितीय मिश्रणाबद्दल तुझा आभारी आहे!

    तुझ्या बरोबर जगणे रास्त होते!

    सर्व गोष्टींसाठी तुझा आभारी आहे!

    भाग 1:

    चेतावनी

    प्रकरण 1

    चेतावनी: सेवकाचे विवाह सर्वसाधारण विवाहांपेक्षा वेगळे असतात.

    यहूदा देशांत व यरूशलेमेच्या आळयाआळयांतून केलेली तुमच्या पूर्वजांची दुष्कृत्ये, यहूदाचे राजे व त्यांच्या स्त्रियांची दुष्कुत्ये तुमची स्वतांची व तुमच्या स्त्रियांची दुष्कृत्ये हयांचा तुम्हाला विसर पडला काय?

    यिर्मया 44:9

    जर तुम्ही पाळक नाही तर हे पुस्तक तुम्हाला लागू होत नाही.

    जर तुम्ही पाळक नाही तर हे पुस्तक पुढे वाचू नका.

    जर तुम्ही पाळक नाही तर इथेच थांबा.

    जर तुम्ही पाळक नाही आणि तुम्ही पुढे वाचत राहाल तर ज्या गोष्टी तुम्हाला समजणार नाहीत त्याची तुम्ही टिका कराल.

    जर तुम्ही पाळक नाही तर विवाहावर तुम्ही दुसरे पुस्तक घ्या. इतर अनेक पुस्तक आहे जे तुमची भरपूर मदत करतील.

    जर तुम्हाला पुस्तक कसे प्राप्त करावे ह्यावर माहीती हवी असेल तर तुमच्या जवळच्या पुस्तकाच्या दुकानाशी संपर्क साधा. उत्तम विवाह असणे हा आर्शिवाद आहे आणि मी असे अनेक महान व चांगले विवाह जाणतो की जे अद्भूत आर्शीवाद असे आहेत. चांगल्या विवाहाचे काही आर्शिवाद कोणते आहेत?

    1.चांगला विवाह आर्शिवाद आहे कारण एकापेक्षा दोघे बरे. ह्या वास्तविकेला पृष्टी देणारे अनेक शास्त्रपाठ आहेत.

    एकटयापेक्षा दोघे बरे, कारण त्यांच्या श्रमाचे त्यांना चांगले फळ प्राप्त होते. त्यातला एक पडला तर त्याचा सोबती त्याला हात देईल, पण जो एकटा असून पडतो त्याला हात देण्यास कोणी नसते, त्याची दुर्दशा होते. दोघे एकत्र निजले तर त्यांस उब येते, एकटयाला उब कशी येईल? जो एकटा असतो त्याला कोणी माणूस भारी झाला तर त्याचा प्रतिकार दोघांना करिता येईल. तीनपउरी दोरी सहसा तुटत नाही.

    उपदेशक 4:9-12

    2. चांगला विवाह चांगला आहे कारण विवाहित जोडपे एका व्यक्ति पेक्षा दहा पट अधिक काम करू शकतात.

    त्यांच्या दुर्गाने त्यांचा विक्रय केला नसता, परमेश्वराने त्यांना परकीयांच्या हाती दिले नसते, तर एकाने सहस्त्रांचा पाठलाग कसा केला असता! दोघांनी दशसहस्त्रांना कसे पळविले असते.

    अनुवाद 32:10

    3. चांगला विवाह आर्शिवाद आहे कारण पुरूषाला देवाची मर्जी प्राप्त होते.

    ज्याला गृहिणी लाभते त्यास उत्तम लाभ घडतो. त्यास परमेश्वराचा अनुग्रह प्राप्त होतो.

    निती 18:22

    चांगला विवाह मोठा आर्शिवाद असला तरी, अनेक प्रकारचे विवाह आहेत. सर्वच विवाह दांपत्यासाठी आर्शिवादाचे कारण होत नाही.

    ‘बनावटी’ विवाह केवळ ह्यासाठी अस्तित्वात असतात की ते खरे व चांगले आहेत.

    हे पुस्तक विशिष्ट प्रकारच्या विवाहा संबंधी आहे जे अस्तित्वात आहेत. हे पुस्तक पाळक व त्यांच्या विवाहांसाठी आहे आणि सर्वसाधारण ख्रिस्ती किंवा अविश्वासणा-यांसाठी नाही. ह्या पुस्तकातील बहुतांश भाग जर तुम्ही पाळक किंवा पाळकाची पत्नी नाही तर तुमच्यासाठी नाही.

    विवाहासंबंधी अनेक पुस्तकं पाळकांना असे वाटण्यास भाग पाडते की त्यांनी चूकीच्या व्यक्ति बरोबर विवाह केले कारण त्यांचा विवाह हा लेखकांच्या विवाहाइतका चांगला वाटत नाही.

    नंतर जेव्हा त्यांना कळते की ज्या पाळकांचा विवाह इतका चांगला आहे असे दिसत होते ते घटस्फोट घेत आहेत तेव्हा त्यांना धक्का बसतो.

    हे पुस्तक साधारण विवाहासंबंधी नाही. हे पुस्तक वैवाहिक समस्यांवरील दुर्तफी चर्चा नाही. मी पती व पत्नी दोघांबददलही पुस्तक लिहे शकलो असतो. यशस्वी विवाह कसा प्राप्त करावा ह्याबददलही मी पुस्तक लिहू शकलो असतो. मी विवाहात येणा-या समस्यांवर विजय कसा मिळवावा ह्यावर सुध्दा पुस्तक लिहू शकलो असतो. परंतू ह्या आवृत्तीत मी तसे करत नाही. मी अशा विषयावर पुस्तक लिहण्याची निवड केली आहे ज्याची सहसा चर्चा केली जात नाही.

    हे पुस्तक पत्नींच्या दुष्टतेबददल आहे. मी हे पुस्तक अनेक पत्नींच्या सौंदर्याखाली लपलेल्या दुष्टतेबददल लिहित आहे. जर तुम्ही विवाहावर चांगले पुस्तक शोधत आहात तर हे पुस्तक नव्हे तर दुसरे पुस्तक वाचा. हे पुस्तक काही पाळकांच्या पत्नींमध्ये असलेले सौंदर्य व त्यामागील प्राणी व ह्याबरोबर पाळकांचे झगडणे ह्याबददल आहे. अनेक पाळक सुंदर स्त्रीयांबरोबर विवाह करतात! अनेक सुंदर स्त्रीया प्राणी असतात.

    मला माहीत आहे की अनेक लोक घाबरतील की द्याळू आणि चांगल्या दिसणा-या पत्नीमध्ये सुध्दा दुष्टता असू शकते. मी आधी म्हटल्या प्रमाणे मी विवाहावर दुतर्फी चर्चा करू इच्छित नाही. जर तुम्हाला पुरूषांचे चांगले व वाईट पैलू व स्त्रीयांचे चांगले व वाईट पैलू ह्यावर चर्चा करायची आहे तर कृपा करून वाचणे थांबवा. हे पुस्तक पत्नींच्या दुष्टते संबंधी आहे, विशेषतः काही ख्रिस्ती पत्नी व काही पाळकांच्या पत्नींबददल.

    संदेष्टा यिर्मया याने यहूदा व यरूशलेम ह्यातील पत्नींच्या दुष्टतेसंबंधी विलाप केला. ह्या पत्नी विश्वासाणा-या प्तनया नव्हत्या तर इस्त्रायल घराण्यातील होत्या. पत्नींची दुष्टता ज्या बददल यिर्मया बोलला ते मूर्तीपूजा व देवाविरूध्द बंड ह्याबददल होती. ज्या दुष्टतेबददल मी लिहित आहे ती देखील काही पाळकांची देवाच्या वचना विरूध्द जी दुष्टता त्याबददल आहे.

    हे पुस्तक खरंच काही पाळक व त्यांच्या पतनया ह्या बददल आहे. काही सर्मपित ख्रिस्ती व देवाची माणसे त्यांच्या विवाहामध्ये जे अनुभवतात त्याचे वर्णन हे पुस्तक करते. हे पुस्तक अशा वैवाहिक परिस्थीती बददल आहे ज्या बददल सेवक बोलू शकत नाहीत.

    तथापी तू लग्न केलेस म्हणून पाप केलेस असे होत नाही, तसेच कुमारीकेने लग्न केले म्हणून तिने पाप केले असे होत नाही तरी पण अशांना संसारांत हालअपेष्टा भोगाव्या लागतील आणि अशा हाल अपेष्टा तुम्हाला भोगाव्या लागू नये अशी माझी इच्छा आहे.

    1 करिंथ 7:28

    पौलाने भविष्य वाणी केली होती की जे लग्न करतील त्यांना देहात त्रास होईल. कदाचीत ह्यामूळेच त्याने विवाह केला नाही. आणि मी हे पुस्तक ह्यासाठी लिहिले नाही की मला पुरूषांबददल काही नकारात्मक माहीत नाही. मला माहीत आहे! आणी मी हे पुस्तक ह्यासाठीही लिहिले नाही की मला स्त्रीयांबददल नकारात्मक गोष्टी लिहायच्या आहेत. मी सेवेवर, अभिषेक, ज्ञान आणि स्त्रीयांची भूमिका ह्यावर इतका विश्वास ठेवतो की मी माझ्या सेवेमध्ये स्त्रीयांची नेमणूक केली आहे त्यांना प्रोत्साहित केले.

    तुम्ही वाचन कराल तेव्हा कदाचीत तुम्हाला वाटेल की मी स्त्रीयांच्या वाईट गोष्टी पुरूषांच्या वाईट गोष्टींशी समतोल का करत नाही. कारण साधे आहे ह्या पुस्तकाचे ध्येय ते नाही! जर मी विवाह बध्द पुरूषांच्या भयंकर पापाबददल पुस्तक लिहिले तर मी देवाने मला दिलेला संदेश पूर्णपणे टाळेल. जर मी तसे केले तर हे पुस्तक आहे त्या पेक्षा बरेच मोठे राहील आणि जे लोक वाचन करत नाहीत ते ते पुस्तक वाचण्याचा प्रयत्नही करणार नाहीत.

    हे पुस्तक स्त्रीयांनी सेवकांच्या जीवनामध्ये निभावलेल्या काही विचित्र भूमिकेंबददल आहे. आम्ही आपल्या महिलांची स्तुति करतो आणि त्यांची विवाह व सेवेतील जी भूमिका त्या बददल आभारी आहोत. त्यांच्या मदती शिवाय आपण देवाच्या कार्यात ज्यास्त काही प्राप्त करू शकणार नाही. माझा असा विश्वास आहे की मंडळीची वाढ होण्यासाठी एक गुपित हे आहे की आपण स्त्रीयांबरोबर काम करावे व त्यांना महत्व द्यावे.

    स्त्रीयांची स्तुति केल्या जाते परंतू त्यांच्या नकारात्मक गोष्टींबददल ज्यास्त बोलले जात नाही, कारण प्रत्येकाला वाईट दिसणे आवडत नाही किंवा त्यांच्या विवाहामध्ये त्यांना समस्या आहेत असे दाखविणे आवडत नाही. परंतू तुमच्या फायद्याचे जे आहे ते मी मागे राखून ठेवणार नाही.

    ... जे हितकारक ते तुम्हांला सांगण्यात आणि चार लोकांत व घरोघरी शिकविण्यात मी कसूर केली नाही.

    प्रेषित 20:20

    सौंदर्य वास्तव आहे परंतू श्वापदहि वास्तव आहेत! सेवेमध्ये महिलांच्या नाश करणा-या भूमिकेबददल थोडे बोलले जाते. आपले पुस्तक पवित्र शास्त्र हे जगाच्या नाशामध्ये स्त्रीयांच्या भूमिकेबददल शांत नाही. हवेद्वारे, आदामाचे जीवन आणि सेवा नष्ट झाली. हवे द्वारे संपूर्ण मानव जात अंधकार आणि समस्येत ढकलली गेली.

    अनेक पाळक आहेत जे त्यांच्या सुंदर बाहेरून चांगल्या दिसणा-या पत्नींमूळे निराशेत, अंधकारात आणि समस्येत आहेत.

    ह्या पुस्तकाचे कारण हे आहे की काही लोक ज्याचा अनुभव घेत आहेत त्याचे खरे चित्र त्यांना दाखवावे.

    ह्या पुस्तकाचे आणखी एक कारण हे आहे की जे लोक सुंदरतेची निवड करित आहेत त्यांनाही मदत करावी. त्यांनी हे समजणे महत्वाचे आहे की त्यांची सुंदरी हे सहज श्वापद बनू शकते!

    जेव्हा जॉन वेस्ली हा आजारी पडला तेव्हा तो एका स्त्री बरोबर राहीला जी पूढे त्याची पत्नी झाली. त्याने वर्णन केले की ती किती सुंदर, आनंददायी आणि चांगली होती. तिचे शब्द आठवणीत ठेवण्यासारखे होते! तीचा आवाज मंद होता! जॉन वेस्ली तिच्या समाधान देणा-या प्रिती कडे आकर्षित झाले! त्यांच्या शब्दात मॉली, त्यांची भावी पत्नी त्यांना आवश्यक तो विष्वास देत असे. त्याने तिची प्रिती तिव्र होती असे म्हटले. तो तिच्या अयोग्य प्रेमा बददल बोलला. इंग्रजीतील शब्द इनवायोलेबल स्नेहभाव ह्याचे मी भाषांतर करू शकत नाही. मला जॉन वेस्ली चे शब्द सांगावेसे वाटतात, जेव्हा तो त्याच्या ‘सुंदरीला’ त्याच्या ‘प्रियेला’ भेटला. (लग्न होण्या आधी)

    जॉन वेस्ली म्हणाला,‘तिव्र प्रेम आणि भावनेसंबंधी शब्द जो विश्वास देवू शकत होते तो माझ्या कडे होता.

    परंतू लग्न झाल्यावर एक दिवस त्याने तिचे वर्णन करण्यसाठी पूर्णपणे वेगळे शब्द वापरले. त्याची सुंदरी ही प्राण्यासम झाली होती. एका दिवशी त्याची पत्नी घरून प्रवासाला निघाली. ही स्त्री जिच्या बददल त्याला भरपूर प्रेम होते असे तो म्हणाला होता. तिला तो दाराबाहेर जातांना म्हणालाः ‘मी तुझा विकृत चेहरा परत कधीच पाहू नये असे मला वाटते.’

    जेव्हा त्याची सुंदरी ही प्राण्यासमान झाली तेव्हा त्याने अशी इच्छा दर्शविली की, ‘मी तुझा विकृत चेहरा परत कधीच पाहू नये असे मला वाटते.’ एक पाळक जेव्हा सुंदर स्त्री बरोबर विवाह करतो आणि ती प्राणीसमान होते त्याचे हे उत्तम उदाहरण आहे!

    खरंच हे पुस्तक जे पलटविता येणार नाही अशा वैवाहिक स्थितीत आहे अशांचे हात सबळ करण्यासाठी लिहिण्यात आले आहे. मी आशा करतो की हे पुस्तक सेवकांना घटस्फोटापासून वाचवेल आणि ते खरोखर कशाचा अनुभव घेत आहे हे समजण्यासाठी मदत करेल.

    मला खात्री आहे की अनेक लोक ह्या पुस्तकातील गोष्टी समजतील. ह्या पुस्तकातून प्राप्त होणारे ज्ञान, समज आणि माहीती ह्याचा वापर विश्वासाचे सुयुध्द लढण्यासाठी करा. विवाह आपण सामोरे जात असलेली एक परिक्षा आहे आणि आपण त्यात यशस्वी झालो पाहिजे! काही लोकांसाठी विवाह हे त्यांना प्राप्त होणारे सर्वात मोठे सुख असू शकते. काहींसाठी विवाह हा त्यांचा मोठा वधस्तंभ असू शकतो जो त्यांना वाहायचा आहे. काही लोकांचे वैवाहिक जीवन उत्तम असते. आणि अनेक सेवक असतात जे त्यांच्या विवाहाचे वर्णन एक युध्द म्हणून करतात.

    देवाचे अनेक सेवक त्याच्या परिपूर्ण विवाहाबददल बोलतात ज्यामूळे इतर ख्रीसती लोक किंवा पाळक हे घाबरून जातात. जेव्हा इतर सेवक त्यांच्या वैवाहिक जीवनाबददल एकतात तेव्हा ते स्वतःला लहान समजतात. आणि ते म्हणतात, ‘मी माझ्या वैवाहिक स्थिती बददल ह्या आर्शिवादीत लोकां बरोबर बोलू नये.’ (जेव्हा पाळक मोठया पाळकांच्या सभेत जातात आणि तिथे हजारो सभासद असलेल्या मंडळयांबददल महान गोष्टी एकतात तेव्हाही असे होते) अनेक साधारण पाळकांना कमीपणा वाटतो कारण त्यांच्या मंडळीमध्ये हजारो सभासद येत नाहीत.

    पाळक परिपूर्ण विवाहांबददल असे अद्भूत विधानं ऐकतातः

    माझी पत्नी जगातील सर्वात सुंदर स्त्री आहे.

    माझे जीवन व माझी सेवा ह्याचे श्रेय माझ्या पत्नीला जाते.

    माझ्या पत्नी विना मी कुठे असतो माहित नाही!

    तुझ्या शिवाय मी नसतो.

    तुझ्या सारखी इतर कोणी नाही! तू करतेस तसे माझ्या मनाला कोणी स्पर्श करू शकत नाही.

    मी माझ्या पत्नी शिवाय कुठेच जावू शकत नाही.

    माझी पत्नी सर्वात मोठी सहकारी, सहायक आणि आधार आहे.

    मी माझ्या पत्नी बरोबर या आधी कधी भांडण केले नाही.

    मी दररोज दहा वेळेस माझ्या पत्नीला आय लव यू म्हणतो.

    माझ्या पत्नी बरोबर एक दिवस नराहण्याची कल्पना मी करू शकत नाही.

    मी आणि माझी पत्नी रोज रात्री एकमेकांच्या कुशीत झोपतो!

    माझी पत्नी माझी जगातील सर्वात जवळची मैत्रीण आहे.

    जेव्हा मला माझ्या पत्नीची आठवण येते तेव्हा मी तिच्या फोटोचा मुका घेतो. परंतू जेव्हा ती समोर येते तेव्हा मी तिचा मुका घेतो!

    माझी पत्नी जगातील सर्वात सुंदर स्त्री, माझी आत्मीक जोडीदार, माझी सहचारीनी, माझी मैत्रीण, माझा आनंद, माझी प्रिय व हद्याचा ठोका आहे!

    जर विवाहाला गुण देता आले तर मला 99 टक्के गुण मिळतील.

    वाह! हे विधानं अद्भूत आहेत! मी आशा करतो की आपल्यातील सर्वच असे बोलू शकले असते. जर आपल्याला सेवेमध्ये यशस्वी व्हायचे असेल तर आपले विवाह असेच असले पाहिजे.

    परंतु सर्व विवाहीत सेवकांचा अनुभव असा नसतो! मला कसे माहीत आहे? मला माहीत आहे कारण मी अनेक वर्षांपासून सेवेत आहे आणि हजारो पाळकांना ओळखतो. मला हे देखील माहित आहे की पाळकांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण ज्यास्त आहे. अनेक सेवकांनी वरील प्रमाणे विधानं केले आहेत, ज्यात सर्वात वरच्या पातळीचे प्रेम ह्याबददल ते सांगतांत आणि नंतर सांगतात की ते घटस्फोट घेत आहेत.

    काही लोकांसाठी, त्यांच्या विधानांच्या विरूध्द गोष्टी ख-या असतात. काही पाळक असे म्हणणे पसंत करतीलः

    माझी पत्नी जगातील सर्वात सुंदर स्त्री असेल परंतू तिच्या बरोबर राहणे सोपे नाही!

    माझ्या पत्नी पासून माझी सुटका व्हावी अशी इच्छा मि बाळगतो!

    माझ्या जीवनात व सेवेत सर्वात मोठी विरोधक माझी पत्नी आहे.

    माझ्या जीवनातील सर्वात मोठी दोष देणारी व त्रास देणारी व्यक्ति माझी पत्नी आहे.

    आम्ही अनेक महिन्यांपासून शारीरिक संबंध ठेवले नाहीत.

    मी आणि माझी पत्नी अनेक महिन्यांपासून एकमेकांबरोबर बोलत नाही.

    मी माझ्या पत्नीला आय लव यू म्हणत नाही कारण मला खोटे बोलायचे नाही.

    मी त्यादिवसाची आतूरतेने वाट पाहत आहे जेव्हा मी माझ्या पत्नी शिवाय राहू शकेल.

    मी आणि माझी पत्नी पलंगाच्या दोन कडांवर झोपतो!

    मी आता माझ्या पत्नीच्या जवळ नाही!

    मला माझ्या पत्नीची आठवण येत नाही. जेव्हा मी तिचा फोटो पाहतो, तेव्हा माझे मन दुःखी होते.

    माझे लग्न माझ्या जीवनातील सर्वात मोठी चूक आहे.

    जर मला दुसरी पत्नी असती तर मी सेवेत अधीक यशस्वी झालो असतो.

    जेव्हा विवाहाचा प्रश्न येतो तेव्हा आपल्यातिल बरेच लोक आफ्रीकन वनऔषधी देणा-या सारखे वागतात. मी असे का म्हणतो? वनऔषधी देणा-याकडे एकच पूडी असते जी सर्व आजारावर उपचार करू शकते. हा औषध देणारा खराब दृष्टी, मूळव्याध, दात दूखी, बीपी, मधूमेह, कर्करोग, रॅश, अस्थमा, कंबर दुखी, लैगिंक समस्या, बध्दकोष्ठ, अतिसार, साधारण कमजोरी इ. बरी करू शकतो. तुम्ही ह्या वनऔषधी देणा-याला त्याच्या पूडीची जाहीरात करतांना ऐकू शकता व तो त्याच्या श्रोत्यांना उत्साहाने प्रवृत्त करतो. केवळ तेच लोक भूलविले जातात जे ह्या गोष्टीशी सजान नसतात की एकच औषध हे सर्वकाही बरे करू शकत नाही. आपल्या सर्वांना माहीत आहे की एकच औषध तुमची दृष्टी, कंबर दुखी, अतिसार, त्वचा रोग तसेच उच्च रक्त दाब, मूळव्याध बरा करू शकत नाही.

    तरी जेव्हा विवाहाचा प्रश्न येतो तेव्हा ब-याच लोकांचा समज आहे की एकच औषध सर्व विवाहांना लागू होईल. ते मानतात की प्रत्येक विवाहावर एकच उपाय आहे. ही मोठी चूक आहे कारण विवाह वेगवेगळया प्रकारचे असतात.

    काही वेळेस एक चांगला विश्वासू पती असतो जो एका पतीने जे केले पाहीजे ते सर्व करतो. आणि ह्या विश्वासू पतीची त्याच्या प्रमाणेच चांगली पत्नी असते जी एका विश्वासू पत्नीने जे केले पाहिजे ते सर्व करते. दुसरी कडे, एका विश्वासू पतीची पत्नी सर्वात वाईट प्रकारची स्त्री असू शकते. एका एकनिष्ठ पत्नीला वाईट पती असू शकतो ज्याला पत्नी असावी अशी लायकीही नाही.

    अनेक परिस्थिती इतक्या विभिन्न असतात की प्रत्येकाला वेगवेगळं समजून घ्यावे लागेल. चांगल्या व वाईटाला एकाच दिवशी वधस्तंभावर खिळणे चूकीचे आहे. (येशूला चोरांबरोबर खिळले गेले आणि त्यामूळे असे चित्र दिसले की तो सर्वसाधारण चोर होता कारण त्याला साधारण गुन्हेगारा प्रमाणेच शिक्षा देण्यात आली).

    प्रत्येक विवाह वेगवेगळे अनुभव देतो. काही लोकांना केवळ उत्तम विवाहाच्या सात पाय-यांचे अवलंबन करायचे असते आणि त्यांना महान आनंद मिळतो. इतर असतात जे उत्तम विवाहाच्या सत्तर पाय-यांचे" अवलंबन करतात परंतू त्यांना कधीच आनंद मिळत नाही.

    खरंच मी अनेक अशा लोकांना भेटलो आहे जे विवाह करण्यास योग्य नाहीत. ते विवाह करू शकत नाही किंवा त्यांनी तो करू नये कारण ते विवाहास योग्य नाहीत. ते कोणत्याही वैवाहिक परिस्थितीसाठी योग्य नाहीत. दुर्दैवाने जेव्हा विवाहास अयोग्य स्त्री सुंदर असते तेव्हा तिचा लगेच लगेच विवाह होतो आणि ती पाळकासाठी सहन न करता येण्यासारखी परिस्थिती निर्माण करते. सर्वसाधारण व्यक्तिला देण्यात येणारा सल्ला हा विवाहास अयोग्य व्यक्तिला देण्यात येणा-या सल्ल्यापेक्षा वेगळा असावा.

    हे पुस्तक विशिष्ट प्रकारच्या विवाहांना सल्ला देण्यासाठी लिहिण्यात आले आहे. तुम्ही जर चांगल्या वैवाहिक स्थितीत असाल तर सावध असा कारण ज्या विवाहांना तुम्ही समजू शकत नाही त्यांच्यावर टिका करण्याचा मोह तुम्हाला होईल!

    ह्या संपूर्ण पुस्तकात माझ्या वयैक्तिक विवाहात मी जो आर्शिवाद अनुभवला त्याचा उल्लेख मी केला नाही. माझ्या वैवाहिक जीवनातील आव्हानंही मी सांगणार नाही. ते का? जर मी माझ्या वैवाहिक जीवनातील आर्शिवाद सांगितले तर कदाचीत तुम्ही निराश व्हाल की तुमचे वैवाहिक जीवन चांगले नाही. खरोखर जर मी माझ्या आव्हानां बददल बोललो तर कदाचीत तुम्ही ते समजणार नाही! म्हणून आर्शीवादीत व्हा आणि ह्या पुस्तकातील शब्दांद्वारे तुमच्या जीवनासाठी व तुमच्या विवाहासाठी आरोग्य प्राप्त करा.

    प्रकरण 2

    चेतावनीः सेवेतील विवाहात सत्ता बदलाचे सामर्थ्याचा समतोल

    सर्व गोष्टीत मला मोकळीक आहे, तरी सर्व गोष्टी हितकारक असतातच असे नाही, सर्व गोष्टीची मला मोकळीक आहे, तरी मी कोणत्याहि गोष्टीच्या आहारी जाणार नाही.

    1 करिंथ 6:12

    प्राण्यामध्ये सत्तेचा समतोल साधण्यासाठी होणारे बदल पाहणे मनोरंजक असते. हत्तीचा कळप आणि सिहांच्या समूहाला पाहिल्या नंतर तुम्हाला कळेल की सत्तेचा समतोल कसा एका गटाकडून दुस-या गटाकडे जातो. दिवसा हत्ती स्पष्ट पाहू शकतात आणि त्यांच्या जवळ येणा-या कोणत्याही सिंहाला मारू शकतात. दिवसा सिंह हत्तींच्या वाटयाला जात नाहीत.

    परंतू रात्र होते आणि अंधार पसरतो, सिंह स्पष्ट पणे पाहू शकतात आणि हत्ती मात्र रात्री पाहू शकत नाहीत. आता सत्तेचा कल हा सिंहाच्या बाजूने होतो, आणि ते हत्तींवर हल्ला करू शकतात व त्यांना मारूही शकतात. रात्रीच्या वेळेस जेव्हा सत्तेचा कल त्यांच्या बाजूने असतो तेव्हा सिंह हत्तीला मारण्यासाठी जाणले जातात. एका मोठया हत्तीला खाणारा सिंहाचा समूह पाहणे रोमांचक असते.

    विवाहांमध्ये सुध्दा सत्ता बदलते. दोन प्रकारे सत्तेचा कल बदलू शकतो.

    अविश्वासणा-या बरोबर विवाह (किंवा एक्स5 पति व ए1 म्हणजे प्राणी) सत्तेचा

    Enjoying the preview?
    Page 1 of 1