लायकोस: अदिक्षित लोक आणि सेवाकार्य
()
About this ebook
लायकोस ह्या ग्रीक शब्दातून अदिक्षित मनुष्य हा शब्द आला आहे ज्याचा अर्थ “कोणतेहि कौशल्य नसणारा मनुष्य,” “कौशल्य नसणा-या” लोकांकडून महान गोष्टीं साध्य केल्या जाऊ शकतात असे इतिहासाने आपल्याला शिकविले आहे. मंडळीमध्ये अदिक्षित लोक काम करीत नसतील तर काय होईल;
Dag Heward-Mills
Bishop Dag Heward-Mills is a medical doctor by profession and the founder of the United Denominations Originating from the Lighthouse Group of Churches (UD-OLGC). The UD-OLGC comprises over three thousand churches pastored by seasoned ministers, groomed and trained in-house. Bishop Dag Heward-Mills oversees this charismatic group of denominations, which operates in over 90 different countries in Africa, Asia, Europe, the Caribbean, Australia, and North and South America. With a ministry spanning over thirty years, Dag Heward-Mills has authored several books with bestsellers including ‘The Art of Leadership’, ‘Loyalty and Disloyalty’, and ‘The Mega Church’. He is considered to be the largest publishing author in Africa, having had his books translated into over 52 languages with more than 40 million copies in print.
Related to लायकोस
Related ebooks
तुमचे सेवाकार्य वाढवा Rating: 0 out of 5 stars0 ratingsअनुसरण करण्याची कला Rating: 0 out of 5 stars0 ratingsमंडळी रोपण Rating: 0 out of 5 stars0 ratingsविश्वासातून माघारी जाणे Rating: 0 out of 5 stars0 ratingsइतर लोक.... Rating: 0 out of 5 stars0 ratingsझाड आणि तुमचे सेवाकार्य Rating: 0 out of 5 stars0 ratingsदुष्ट आत्मे आणि त्यांच्याशी कसा व्यवहार कराल Rating: 5 out of 5 stars5/5अभिषेकाचे मधुर प्रभाव Rating: 0 out of 5 stars0 ratingsप्रार्थना कशी करावी Rating: 0 out of 5 stars0 ratingsतुम्ही सामर्थी ख्रिस्ती कसे होऊ शकता Rating: 0 out of 5 stars0 ratingsअभिषिक्त आणि त्याचा अभिषेक Rating: 0 out of 5 stars0 ratingsत्यांना सांगा तुम्ही आत्मे जिंकणारा का व्हायला पाहिजे याची १२० कारणे Rating: 0 out of 5 stars0 ratingsChanakya Neeti In Marathi Rating: 5 out of 5 stars5/5आपले पवित्र शास्त्र वाचा, दररोज प्रार्थना करा Rating: 0 out of 5 stars0 ratingsबोलावलेले पुष्कळ आहेत Rating: 0 out of 5 stars0 ratingsमेंढपाळ बनण्याची कला Rating: 3 out of 5 stars3/5आपल्या पाळकीय सेवेला बदला Rating: 5 out of 5 stars5/5रक्तातील सामर्थ्य Rating: 5 out of 5 stars5/5अनागाझो Rating: 0 out of 5 stars0 ratingsपवित्र शास्त्राचे पाठांतर करण्यासाठीचे अत्यंत महत्वपूर्ण हस्तपुस्तक Rating: 0 out of 5 stars0 ratingsतुमच्या सेवाकार्याचा संपूर्ण पुरावा तुम्ही कसा तयार करावा Rating: 0 out of 5 stars0 ratingsमेंढपाळ होण्याचा अर्थ काय आहे Rating: 0 out of 5 stars0 ratingsमुली तू हे करू शकतेस Rating: 0 out of 5 stars0 ratingsचमत्कार Rating: 0 out of 5 stars0 ratingsअशक्तपणा आणि रोग नष्ट करा: अशक्तपणा आणि रोगांचे बळ नष्ट करण्यासाठी शक्तिशाली प्रार्थना Rating: 0 out of 5 stars0 ratingsविजय रहस्य Rating: 0 out of 5 stars0 ratingsसेवाकार्यातील नैतिकता Rating: 0 out of 5 stars0 ratingsगमावणे दुखसहन बलिदान आणि मृत्युमुखी पडणे Rating: 0 out of 5 stars0 ratingsज्याला आहे त्याला दिले जाईल व ज्याला नाही Rating: 0 out of 5 stars0 ratingsसापासारखे चतुर होणे म्हणजे काय Rating: 0 out of 5 stars0 ratings
Reviews for लायकोस
0 ratings0 reviews
Book preview
लायकोस - Dag Heward-Mills
अध्याय १
लायकोस: अदिक्षित मनुष्य
लायकोस ह्या ग्रीक शब्दातून अदिक्षित मनुष्य हा शब्द आला आहे ज्याचा अर्थ कोणतेहि कौशल्य नसणारा मनुष्य,
कौशल्य नसणा-या
लोकांकडून महान गोष्टीं साध्य केल्या जाऊ शकतात असे इतिहासाने आपल्याला शिकविले आहे. अदिक्षित किंवा सामान्य लोकांच्या यशाबद्दल एक द्रुत अवलोकन तुम्हांला त्यांचा सेवाकार्यामध्ये उपयोग करून घेण्यांस प्रेरणादायक ठरेल. अदिक्षित माणसांच्या द्वारे आत्म्यांना जिंकले जाईल, घर सभा स्थापित केल्या जातील, मंडळ्यांची वाढ होईल, देवाच्या कामाची भरभराट होईल.
खालीलप्रमाणे अदिक्षित मनुष्याच्या कांही व्याख्या:
१. अदिक्षित मनुष्य हा साधारण व्यक्ती असतो.
२. अदिक्षित मनुष्य हा सरासरी व्यक्ती असतो.
३. अदिक्षित मनुष्य हा मामूली व्यक्ती असतो.
४. अदिक्षित मनुष्य हा नेहमीचा व्यक्ती असतो.
५. अदिक्षित मनुष्य हा नियमित व्यक्ती असतो.
६. अदिक्षित मनुष्य हा सामान्य व्यक्ती असतो.
७. अदिक्षित मनुष्य हा रोजचा व्यक्ती असतो.
८. अदिक्षित मनुष्य हा मध्यमान व्यक्ती असतो.
९. अदिक्षित मनुष्य हा व्यावसायिक व्यक्ती नसतो.
१०.अदिक्षित मनुष्य हा धुरीण व्यक्ती नसतो.
११.अदिक्षित मनुष्य हा विशेष व्यक्ती नसतो.
१२.अदिक्षित मनुष्य हा कुशल व्यक्ती नसतो.
१३.अदिक्षित मनुष्य हा प्रशिक्षित व्यक्ती नसतो.
१४.अदिक्षित मनुष्य हा प्रमाणित व्यक्ती नसतो.
१५.अदिक्षित मनुष्य हा परवाना धारक व्यक्ती नसतो.
मंडळीच्या जगातील महान प्राप्ती
१. अदिक्षित लोक हे मंडळीच्या महान सुधारणेचे स्तंभ होते
सामान्य लोकांच्या भाषेत मार्टिन लुथरने बायबलचे केलेल्या भाषांतराने सर्व जगाला बदलून टाकले. केवळ लॅटिन भाषेमध्ये असण्याऐवजी, बायबल हे सामान्य लोकांना अधिक सुलभरित्या उपलब्ध करण्यांत होते. सामान्य अदिक्षित लोकांच्या हाती एकदा प्रकटीकरण ज्ञान आल्यानंतर त्यांनी जगाला बदलून टाकले. देवाच्या कृपेने तारण हे सर्व मानवजातीला उपलब्ध आहे ह्याची त्यांना जाणीव झाल्यावर ते जागृत झाले व आपल्याला आता जे माहित आहे त्या सुधारणेचे ते कैवारी झाले.
२. अदिक्षित लोक महान मेथडीस्ट मंडळीचे स्तंभ आहेत.
विसाव्या शतकाच्या मध्यभागी, अम्रीकेमध्ये मेथडीस्टवाद ही सर्वांत मोठी प्रॉटेस्टंट संस्था होती. महान मेथडीस्ट चर्च हे अदिक्षित लोकांच्या पाठीवर स्वार झाले आहे.
मेथडीस्ट मंडळ्यांमध्ये उपदेशाची फार प्रारंभिक परंपरा अशी होती की अदिक्षित उपदेशकांना उपासना सभांमध्ये नेतृत्व करण्यासाठी आणि सर्किट
म्हटल्या जाणा-या मंडळ्यांच्या गटांमध्ये उपदेश देण्यासाठी त्यांची नेमणूक केली जात होती.
मान्य नमुना आणि वेळेनुसार निर्धारित सर्किटच्या उपदेश स्थळांकडे जाण्यासाठी अदिक्षित उपदेशक चालत किंवा घोड्यांवर बसून जात असत.
पाळक आणि सेवक लोकांच्या नियुक्तिनंतर, अदिक्षित उपदेशकांची उपदेश परंपरा ही वैयक्तिक चर्चद्वारे नेमलेले, आणि त्या बदल्यांत जवळच्या मंडळ्यांनी सेवकाचा एक उपांग म्हणून किंवा त्यांच्या नियोजित अनुपस्थितीच्या दरम्यान स्वीकृत आणि आमंत्रित केलेले असे मेथडीस्ट स्थानिक उपदेशक
ह्यांच्या बरोबर पुढे चालत राहिली.
३. जगातील सर्वात मोठ्या एकल चर्चचे अदिक्षित लोक स्तंभ होते
मूलभूत तत्वांच्या एका तत्वावर योईदो फुल गोस्पल चर्चची उभारणी झाली आहे ते तत्व म्हणजे अदिक्षित लोकांद्वारे कार्य करणे होय.
योईदो फुल गोस्पल चर्चची स्थापना डेव्हिड योन्गी चो आणि त्यांची सासू चोई जा शील, ह्या दोघांनी केली, ते दोघेहि असेम्ब्लीस ऑफ गॉड चर्चचे पाळक होते, त्यांनी १ मे १९५८ ह्या दिवशी त्यांची सर्वप्रथम उपासना सभा इतर दुस-या चार महिलांसह चोई जा शील ह्यांच्या घरी सुरु केली होती.
१९७७ वर्षापर्यंत चर्चची सदस्यता पन्नास हजार होऊन, दोन वर्षाच्या काळात ती दुप्पट झाली. ३० नोव्हेंबर १९८१ साली सदस्यता दोन लाखापर्यंत पोहंचली. या वेळी ते जगातील सर्वांत मोठी एकल मंडळी झाली असून, लॉस अन्जेल्स टाईम्सने हे खरे असल्याची त्याला अधिकृत मान्यता दिली आहे.
२००७ साली मंडळीची सदस्यता ८३०,००० झाली आणि प्रत्येक रविवारी मंडळीमध्ये सात सभां होत जिचे सतरा भाषांमध्ये अनुवाद होत असे.
४. नायजेरिया आणि घाना येथे सुरु झालेल्या मंडळ्यांच्या प्रचंड जाळ्याचे अदिक्षित लोकच स्तंभ आहेत.
रीडीमड्ड ख्रिश्चन चर्च ऑफ गॉड नायजेरियामधील त्यांच्या घरासह आणि चर्च ऑफ पेन्टिकॉस्ट्ल त्यांच्या घाना येथील मुख्यालयासह हे दोन्ही चर्चेस अदिक्षित लोकांचा चांगल्याप्रकारे उपयोग करून घेण्याबद्दल ज्ञात आहेत. ह्या दोन्ही सेवाकार्यांचे मंडळ्यांचे एक प्रचंड जाळे आहे आणि ते अदिक्षित लोकांना उपदेश करणे आणि पाळकपण ह्या कार्यासाठी नियमितपणे पाठवितात.
द चर्च ऑफ पेन्टिकॉस्ट्लची स्थापना जेम्स माक्किओन ह्यांनी केली, जे एक आयरिश मिशनरी होते, ज्यांना अपोस्टोलिक चर्च, ब्रॅड फोर्ड, यू. के. यांनी तेव्हा असलेले गोल्ड कोस्ट येथे पाठविले होते.
आता ह्याची संख्या वाढून जवळ जवळ १, ७००००० झाली आहे. चर्च ऑफ पेन्टिकॉस्टच्या जगातील सर्व खंडांमधील ७० राष्ट्रांमध्ये १३००० मंडळ्या (चर्चेस) आहेत.
१९५२ साली रेव्ह. जोसिया अकिंदायोमी यांनी रीडीमड्ड ख्रिश्चन चर्च ऑफ गॉड नायजेरिया ह्याची स्थापना केली.
सेनापती रेव्हरंड इ. ए. आदेबोव यांच्या नेतृत्वाखाली मंडळ्यांची लाखों सदस्यांसहित १४० राष्ट्रांमध्ये वाढ झाली. खरोखर, ही फार मोठी प्राप्ति आहे आणि ते अदिक्षित लोकांच्या निवेशामुळे शक्य झाले होते.
धर्मनिरपेक्ष जगांतील महान प्राप्ति
१. लोकशाहीच्या उत्तम सरकारी व्यवस्थेला अदिक्षित लोकांनी जन्म दिला.
लोकशाही सामान्य लोकांना त्यांची इच्छा असल्यास कार्य करण्यांस आणि सरकार बदलण्यांस संधी देत.
लोकशाही ही अस्वीकार्य अटींनुसार जगण्यांस नकार देण्याचे सामान्य मनुष्याचे सामर्थ्य आहे.
लोकशाही ही राष्ट्रामध्ये सामान्य मनुष्याचा सहभाग आणि प्रभाव आहे.
सर्व सामान्य लोकांना समान संघी मिळावी ह्या सिद्धांतावर लोकशाही उभारली आहे.
२. महान भव्य शक्तीला अदिक्षित लोकांच्या द्वारे जन्म दिला गेला
अमेरिकेची क्रांती ही इतिहास घडविण्यांत सामान्य किंवा अदिक्षित लोकांच्या शक्तीचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. एका सामान्य व्यक्तीने भव्य शक्तीस जन्म दिला. गेल्या शतकाच्या सुरुवातीला, अमेरिकेची क्रांती हा एक यशस्वी प्रयोग होता ज्याने हे जग जे कांही लोकांच्या द्वारे नियंत्रित केले गेले होते ते अनेक लोकांच्या द्वारे नियंत्रित केले जाऊ लागले ह्या अवस्थांतरास (संक्रमणास) चिन्हांकित केले.
सन्स ऑफ लिबर्टी अशा लहान क्रांतिकारक संस्थांद्वारा क्रांतीला मोठा आकार दिला गेला. ह्या संस्था समृद्ध आणि शक्तिशाली जमिनदारांद्वारा नियंत्रित केल्या गेल्या नव्हत्या तर मध्यमान सामाजिक स्थितीचे सामान्य लोक क्रांतीच्या बियांचे रोपण करण्यांस एकत्र आले होते.
३. बराक ओबामाच्या ऐतिहासिक निवडणुकीचा विजय अदिक्षित लोकांद्वारे झाला.
मे २००८, बराक ओबामा, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचे पहिले काळे अध्यक्ष, ह्यांनी युनायटेड स्टेट्सच्या अध्यक्षपदासाठी डेमोक्रेटिक नामांकन जिंकले.
जरी देशातील श्रीमंत आणि प्रभावशाली डेमोक्रॅट हे क्लिंटन समर्थक होते आणि त्यांनी लाखों डॉलर प्रदान केले होते, सामान्य व्यक्तीच्या शक्तीचा वापर करून इतिहासातील कोणत्याही इतर राष्ट्रपती पदाच्या उमेदवारापेक्षा ओबामा यांनी जास्त डॉलर गोळा केले.
ओबामा यांनी त्यांच्या मोहिमेत $ ८० दश लक्ष गोळा केले होते, त्यापैकी बहुतांश सामान्य लोकांकडून लहान व्यक्तिगत योगदानाद्वारे जमा झाले होते.
अध्याय २
अदिक्षित लोक आणि स्वयंसेवक नसतील तर काय होते
१. सेवेमध्ये तुम्ही स्वयं सेवकांना काम मारण्याची अनुमती दिली नाही तर तुम्ही मंडळीमधील बलिदानाच्या ख्रिती तत्वाचा नाश कराल.
मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, माझ्यामागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वत:चा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे.
मत्तय १६:२४
ख्रिस्तीत्वाचे प्रतीक म्हणजे वधस्तंभ आहे. वधस्तंभ हा दु:ख आणि मरण ह्याबद्दल बोलतो. देव अब्राहामाशी बोलला आणि त्याने त्याला त्याच्या सर्वांत मौल्यवान संपत्तीस – त्याच्या पुत्राला देऊन टाकण्यांस सांगितले. दु:खाचे, त्यागाचे, गमाविण्याचे, आणि मरणाचे दिवस संपले असे जर कोणी तुम्हांला सांगितले तर त्यांचे अजिबात ऐकू नका. दु:खाचे, त्यागाचे, गमाविण्याचे, आणि मरणाचे दिवस आता आले आहेत! आपण आपल्या मौल्यवान संपत्तीचा त्याग करावा अशी देव आपल्याकडून अपेक्षा करीत आहे म्हणजे आपण त्याची सेवा करू शकू. मंडळी अशा लोकांनी भरलेली आहे की देव त्यांना त्याग करण्याचे पाचारण देत आहे ह्याची त्यांना जाणीव नाही. ख्रिस्ती धर्म हा त्यागाचा धर्म आहे. ख्रिस्ती धर्म हा वधस्तंभावर आधारित आहे. ख्रिस्ती धर्म हा तुमच्या जीवन गमाविण्यावर आधारित आहे जेणेकरून तुम्ही नवीन जीवन प्राप्त