अनुसरण करण्याची कला
()
About this ebook
शोध करण्याचा उत्साहपूर्ण प्रवास म्हणजे देवाचे अनुसरण करणे आहे. इतर लोकांचे अनुसरण करून त्यांची नकल करणे तर शिकण्याच्या प्राचीन कला आहेत ज्या येशू ख्रिस्ताने प्रशिक्षण देण्याची मुलभूत पद्धत म्हणून निवडली. ह्या प्रशिक्षणाच्या कालबद्ध पद्धतीपासून दूर जायच्या ऐवजी, अनुसरण करण्याच्या कलेचे सौनादार्य आणि नम्रता हे समजून घेण्याची वेळ ही आहे. ह्या पुस्तकात, कोणाचे, कशाचे आणि कसे नुसारण करावे हे योग्य रीतीने तुम्हाला कळेल. डाग- हेवार्द मिल्स ह्यांनी लिहिलेले हे अद्भुत पुस्तक आपल्या ख्रिस्ती अनुभवात अनुसरण करण्याच्या कलेला योग्य स्थान देते.
Dag Heward-Mills
Bishop Dag Heward-Mills is a medical doctor by profession and the founder of the United Denominations Originating from the Lighthouse Group of Churches (UD-OLGC). The UD-OLGC comprises over three thousand churches pastored by seasoned ministers, groomed and trained in-house. Bishop Dag Heward-Mills oversees this charismatic group of denominations, which operates in over 90 different countries in Africa, Asia, Europe, the Caribbean, Australia, and North and South America. With a ministry spanning over thirty years, Dag Heward-Mills has authored several books with bestsellers including ‘The Art of Leadership’, ‘Loyalty and Disloyalty’, and ‘The Mega Church’. He is considered to be the largest publishing author in Africa, having had his books translated into over 52 languages with more than 40 million copies in print.
Related to अनुसरण करण्याची कला
Related ebooks
लायकोस: अदिक्षित लोक आणि सेवाकार्य Rating: 0 out of 5 stars0 ratingsमंडळी रोपण Rating: 0 out of 5 stars0 ratingsअभिषेक पकडून ठेवा Rating: 0 out of 5 stars0 ratingsतुमचे सेवाकार्य वाढवा Rating: 0 out of 5 stars0 ratingsझाड आणि तुमचे सेवाकार्य Rating: 0 out of 5 stars0 ratingsतुमच्या सेवाकार्याचा संपूर्ण पुरावा तुम्ही कसा तयार करावा Rating: 0 out of 5 stars0 ratingsबोलावलेले पुष्कळ आहेत Rating: 0 out of 5 stars0 ratingsप्रार्थना कशी करावी Rating: 0 out of 5 stars0 ratingsसेवाकार्यातील नैतिकता Rating: 0 out of 5 stars0 ratingsविश्वासातून माघारी जाणे Rating: 0 out of 5 stars0 ratingsइतर लोक.... Rating: 0 out of 5 stars0 ratingsअभिषेकाचे मधुर प्रभाव Rating: 0 out of 5 stars0 ratingsमेंढपाळ होण्याचा अर्थ काय आहे Rating: 0 out of 5 stars0 ratingsआपल्या पाळकीय सेवेला बदला Rating: 5 out of 5 stars5/5तुम्ही देवासमवेत दररोज परिणामकारक शांत समय कसा घालवू शकता Rating: 0 out of 5 stars0 ratingsतुम्ही सामर्थी ख्रिस्ती कसे होऊ शकता Rating: 0 out of 5 stars0 ratingsअनागाझो Rating: 0 out of 5 stars0 ratingsजे अज्ञानी असतात Rating: 0 out of 5 stars0 ratingsअभिषिक्त आणि त्याचा अभिषेक Rating: 0 out of 5 stars0 ratingsपवित्र शास्त्राचे पाठांतर करण्यासाठीचे अत्यंत महत्वपूर्ण हस्तपुस्तक Rating: 0 out of 5 stars0 ratingsChanakya Neeti In Marathi Rating: 5 out of 5 stars5/5त्यांना सांगा तुम्ही आत्मे जिंकणारा का व्हायला पाहिजे याची १२० कारणे Rating: 0 out of 5 stars0 ratingsविधींची हस्त पुस्तिका Rating: 0 out of 5 stars0 ratingsअध्यात्मिक धोके Rating: 0 out of 5 stars0 ratingsदुष्ट आत्मे आणि त्यांच्याशी कसा व्यवहार कराल Rating: 5 out of 5 stars5/5मुली तू हे करू शकतेस Rating: 0 out of 5 stars0 ratingsतुम्हांपैकी एक जण सैतान आहे Rating: 0 out of 5 stars0 ratingsLok Vyavhar Rating: 0 out of 5 stars0 ratingsचमत्कार Rating: 0 out of 5 stars0 ratingsशापांना निष्क्रिय कसे करावे Rating: 0 out of 5 stars0 ratings
Reviews for अनुसरण करण्याची कला
0 ratings0 reviews
Book preview
अनुसरण करण्याची कला - Dag Heward-Mills
अध्याय १
अनुसरण करण्याची कला काय आहे?
अनुसरण करण्याच्या कलेची व्याख्या देणे
१. अनुसरण करण्याची कला अनुकरण करण्याची कला आहे.
२. अनुसरण करण्याची कला कोणाचीतरी बरोबरी करण्याची कला आहे.
३. अनुसरण करण्याची कला कोणाचीतरी नकल करण्याची कला आहे.
४. अनुसरण करण्याची कला कोणासारखे तरी बनण्याची करण्याची कला आहे.
५. अनुसरण करण्याची कला पुनर्निर्माण करण्याची कला आहे.
६. अनुसरण करण्याची कला अनुकृती बनवण्याची कला आहे.
७. अनुसरण करण्याची कला दट बनण्याची कला आहे.
८. अनुसरण करण्याची कला जुळे बनण्याची कला आहे.
९. अनुसरण करण्याची कला सांसर्गिक बनण्याची कला आहे.
१०. अनुसरण करण्याची कला पुढे आगेकूच करण्याची कला आहे.
ज्या लोकांनी यशस्वीपणे अनुसरण करण्याच्या कलेचे अवलंबन केले
१. लेकरं अनुसरण करण्याच्या कलेचा वापर करतात.
मोठ्या आणि महान झेप घेत लेकरं पुढे आगेकूच करण्यासाठी नकल करण्याच्या कलेचा उपयोग करतात; थोड्याच वेळेत अनेक कठीण भाषा समजून घेऊन त्या बोलण्याचा प्रयत्न करतात. लहान मूले जे काही शिकतात ते अनुकरण, नकल, किंवा अनुसरण करण्याच्या कलेने होते.
२. अनेक शतके जी राष्ट्रे श्रीमंत आहेत त्यांनी अनुसरण करण्याच्या कलेचा वापर केला आहे.
युरोप आणि अमेरिकेने जगातील सर्वात श्रीमंत राष्ट्रे बनण्यासाठी अनुसरण करण्याच्या कलेचा वापर केला. नकल करण्याच्या द्वारे, प्रत्येक युरोपी देश आपल्या शेजार्यासारखा बनला आणि समान धनवान राष्ट्रात विकसित झाला. त्यांचे रस्ते, इमारती आणि इतर साहित्य समान असतात. त्यांचे बँकेच्या आणि आर्थिक पद्धती सारख्याच असतात. त्यांच्या सैन्यदलातील क्षमता समान आहेत. ह्या सर्व देशांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या जीवनशैली आणि परिस्थिती समान आहेत. खरच, नकल करण्याने, प्रत्येक राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्राशी संबंध ठेऊन, भरभराटीच्या स्पर्धेत मागे राहण्यास नकार दिला.
३. नुकतेच श्रीमंत बनलेली राष्ट्रे हे देखील अनुसरण करण्याची कला वापरतात.
तायवान, चीन, कोरिया हे तर अनुसरण आणि नकल करण्याच्या त्यांच्या क्षमतेसाठी खूप प्रसिद्ध आहेत. खरच, नुकतेच श्रीमंत झालेली राष्ट्रे तर अनुसरण करण्याची कला वापरतात.
मागील पन्नास वर्षात श्रीमंत झालेली राष्ट्रे अनुसरण करण्याच्या क्षेम्तेसाठी प्रसिद्ध आहेत. खरच, त्यांच्या बर्याच उत्पादनांना केवळ अनुकरण असे म्हंटले आहे. त्यांच्या प्रसिद्ध युरोपी अति समान रुपी नमुन्याच्या कार त्यांनी तयार केल्या. ओपेल प्रमाणे त्यांची डेवू कार, मेर्स्डीज बेंझ प्रमाणे त्यांची स्संग्योंग आणि टोयोटा प्रमाणे त्यांची ह्युंदाई ह्या परत बनवण्यास कोरियन लोकांना लाज वाटली नाही. त्यांच्या कोणत्याही प्रकारे लाज न वाटणाऱ्या अनुकरण करण्याने ते तर पुढे आगेकूच करण्याने जगभरातील प्रसिद्ध कार उत्पादक बनले.
तंत्रज्ञान आणि प्रयत्न ह्या प्रत्येक क्षेत्रात, इतर लोक केवळ पुढे जाऊन आगेकूच करतात. ज्यांना नकल करण्याची लाज वाटत होती ते तर केवळ अनुकरण करण्याचे धनी म्हणून पुढे जाऊन अब्जाधीश, कोट्यवधीश आणि महाधनवान बनले.
४. देवाचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याने अनुसरण करण्याची कला वापरली.
येशूने अनुसरण करण्याच्या कलेचा उपयोग जागतिक चळवळीतील अनेक अशिक्षित कोळ्यांना पुढारी आणि व्यवस्थापक ह्यात बदलण्यासाठी केला. देवाचा पुत्र जर अनुसरण करण्याच्या कलेचा प्रशिक्षण देण्याची एकमेव पद्धत म्हणून उपयोग करणार असेल, तर शिकण्याची, प्रशिक्षण आणि शिकवण देण्याची ती सर्वोच्च आणि अत्यंत वरचढ पद्धत ठरेल.
अनुसरण करण्याची कला तर कोणाचीतरी नकल करण्याची कला आहे. ज्या व्यक्तीचे तुम्ही निरीक्षण करता त्यासारखे बनण्याची ही अनुसरण करण्याची कला आहे. तुमच्या पुढेह जे काही आहे त्याचे प्रतिरूप बनणे म्हणजे अनुसरण करण्याची कला आहे. अनुसरण करण्याच्या पुढे आगेकूच करू शकता.
अध्याय २
अनुसरण करण्याच्या कलेत कसे यशस्वी होणे
म्हणजे तुम्ही आळशी होऊ नये, तुम्ही अनुकारी व्हावे…….
इब्री ६:१२
लोकांचे अनुसरण करण्यासाठी अनेक पवित्र शास्त्रीय आज्ञा आपल्याला दिल्या गेल्या आहेत. आपण लोकांचे अनुसरण कसे करावे ह्यासाठी पवित्र शास्त्र अनेक उदाहरणे देते. ह्या अध्यायात, तुम्हाला अनुसरण करण्यात, नकल करण्यात आणि तुमच्या पुढे असणाऱ्या लोकांचे अनुसरण करण्यात याश्वासी तत्वे तुम्ही शिकू शकता.
अनुसरण करण्याचे नऊ तत्वे
१. देवाचे अनुसरण करण्याची निवड केल्याने तुम्ही अनुसरण करण्याच्या कलेत यशस्वी होऊ शकता.
तर मग देवाची प्रिय मुले ह्या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा. आणि ख्रिस्ताने तुमच्यावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वत:ला आपल्याकरता अर्पण व यज्ञ म्हणून दिले, त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला.
इफिसकरास पत्र ५:१-२
यशस्वीपणे देवाचे अनुसरण करणे हे प्रीती व यज्ञ करण्यात चालण्याने केले गेले आहे. देवाचे अनुसरण करणे शक्य होते हे तुम्हाला ठाऊक आहे का? देवाच्या व्यतिरिक्त
देवाचे अनुसरण जर आपल्याला करायचे असेल तर देवाचे वचन आपल्याला काय नक्की करावे हे दाखवते. आपल्याला प्रेम व अर्पण कसे करावे हे शिकले पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी केल्याने तुम्ही स्वतः देवाचे अनुसरण करता ह्याची खात्री बाळगू शकता.
देवाचे अनुसरण करण्यचे तुम्ही सिद्ध केले तर देव प्रीती आहे म्हणून त्याच्या दैवी प्रीतीत तुम्ही चालणारे आहात.
२. जो देवाचा सेवक ख्रिस्ताचे अनुसरण करतो त्याची नकल करण्याच्या कलेत तुम्ही यशस्वी होऊ शकता.
जसा मी ख्रिस्ताचे अनुकरण करणारा आहे, तसे तुम्हीही माझे अनुकरण करणारे व्हा.
१ करिंथकरास पत्र ११:१
पौलाने करिंथ येथील मंडळीला त्याचे अनुसरण करण्याचा इशारा दिला पण जोवर ते येशूचे अनुसरण करतील तोपर्यंतच त्यांनी त्याचे अनुसरण करावे हे देखील सांगितले.
खरच, अनेक सेवक आहेत जे देवाचे अनुसरण करण्याऐवजी अब्जाधीश, व्यापारी आणि राजनेते ह्यांचे अधिक अनुसरण करणारे आहेत. ज्या पुस्तकांचे वाचन ते करतात त्यावरून दिसून येते की येशूच्या ऐवजी इतर जगिक लोकांचे अनुसरण करून त्यांच्यासारखे अधिख होण्याचा प्रयत्न ते करतात. आज, अमेरिकी पाळक, अब्जाधीश आणि यशस्वी व्यापारी ह्यांचे आत्मचरित्र पाळक वाचत आहेत.
३. देवाच्या सेवकाचे अनुसरण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल अशा व्यक्तीचे अनुसरण करून ज्याने तुम्हाला ज्याचे अनुसरण करायचे आहे त्याचे अनुसरण केले आहे.
बंधूंनो, तुम्ही सर्व जण माझे अनुकारी व्, आणि आम्ही तुम्हांला कित्ता घालून दिल्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे लक्ष द्या.
फिलिपेकरास पत्र ३:१७ (एनएलटी)
बर्याच वर्षांपूर्वी मला चमत्काराच्या सेवाकार्यात राहायचे होते. मी ऐकले होते त्यात आतापर्यंत कथ्रीन क्युल्मान ह्यांचे अनुसरण मला करायचे होते कारण त्यांची सगळ्यात थोर चमत्कार सेवा होती. एक वैद्यकीय डॉक्टर म्हणून, तिने ज्याप्रकारचे चमत्कार केले त्याने मी खूपच प्रभावित झालो. पण माझी एक समस्या होती. ती ह्या पृथ्वीवर मला सापडली नाही कारण ती मेली होती. मला तर तितका तोटा सहन करावा लागला कारण कारण मृत व्यक्तीचे अनुसरण कसे करायचे ते मला माहित नव्हते. मृत व्यक्तीला कसे अर्पण द्यायचे मला ठाऊक नव्हते? मृत व्यक्तीशी मी कसे बोलणार होतो? मृतांमधून मी तिच्या आत्म्याला परत बोलावणार होतो का?
अचानक पवित्र आत्म्य्ने मला सांगितले, ‘’कथ्रीन क्युल्मान ह्यांचे अनुसरण करायचे असेल तर बेनी हीनचे अनुसरण कर.’’ माझ्या मार्गावर एक लक्ख प्रकाश चमकला आणि लगेच, मला काय करायचे होते ते मला कळले. बेनी हिंचे अनुसरण करण्याचा मोठा प्रवास मी सुरु केला आणि त्याद्वारे त्याची सेवा, आरोग्य देणे आणि चमत्कार ह्याविषयी शिकलो. हेच तत्व फिलिपे ‘’ज्या लोकांनी माझे उदाहरण अनुसरले त्यांचे तू अनुसरण करू शकतो.’’
४. ज्या लोकांचा समूह प्रभूच्या कृपेत चालतो त्यांचे अनुसरण तुम्ही करू शकता.
तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन स्वीकारून आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झालात;
१ थेसलोनिकरास पत्र १:६
केवळ एकाच व्यक्तीचे अनुसरण करण्या ऐवजी, ठराविक पद्धतीने जे लोक चालतात त्या लोकांच्या गटाचे अनुसरण तुम्ही करू शकता. उदाहरणार्थ, विशिष्ट मंडळी किंवा सेवाकार्य ह्यातील पुढार्यांचे अनुसरण तुम्ही करू शकता. जे मित्रगन देवाचे एकत्रित होऊन सेवन करतात त्यांचे देखील तुम्ही अनुसरण करू शकता.
बर्याच वर्षांच्या पूर्वी, माझी केनेथ हगीण ह्यांच्याशी ओळख झाल्यावर, ते कोणत्या लोकांशी जोडले गेले आहेत हे मी पाहिले. केनेथ कोप्लंड, जेरी सावेल, फ्रेड प्राईस, चार्ल्स काप्प्स आणि जॉन ओस्तीन हे त्यांच्या परीशादानाम्ध्ये व वृत्तपत्रात दिसले. विश्वासाचे हे योद्धे मला आकर्षक दिसले आणि मी त्यांचे अनुसरण करत आहे असे वाटले. त्यांची पुस्तके वाचून त्यातून मी शिकू लागलो कारण अनुसरण करण्यासारखे लोक ते होते.
५. एका ठराविक मंडळीचे अनुसरण करणारे होऊन तुम्ही अनुसरण करण्याच्या कलेत यशस्वी होऊ शकता.
बंधूंनो, यहूदील देवाच्या ज्या मंडळ्या ख्रिस्तअनुकरण करणारे झालात, म्हणजे त्यांनी यहदु:खे सोसली तीच तुम्हीही आपल्या देशबांधवांच्या हातून सोसली:
१ थेसलोनिकरास पत्र २:१४
मंडळीचे पुढारी, इतिहास, तत्वप्रणाली, विजये, संकटे शकता. कोणत्याही मंडळीचे अनुसरण करण्यासाठी, तुम्ही अगदी निश्चितच सर्व प्रकारे तिच्या इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे. जसजशी वर्षे सरतात अनेक मंडळयांमध्ये अद्भुत बदल होत राहतात. शंभर वर्षांच्या पूर्वी आज करू शकत नाही.
शंभर वर्षांपूर्वी, स्विस मंडळी इतकी ज्वलंत होती की दहोती. स्विस चर्चच्या परिश्रमांनी, घाना आणि नायजीरीया अशा संपूर्ण राष्ट्रांमध्ये तारण आणि ख्रीस्तीत्व आले आहे. आज स्विस मंडळी इतकी मृतवत आहे की अनेक मंडळया बंद पडल्या आणि ख्रिस्तीत्व ही विदेशी लोक आणि देशात येणाऱ्या लोकांसाठी केवळ एखादी कृती म्हणून बघितली जाते.
आज, ज्या स्विस संस्थेच्या मारातीने जगात इतके सुवार्तिक पाठवले त्याचे रुपांतर एका हॉटेलात झाले आणि त्याच्या खाली एका भागात त्यांच्या थोर सुवार्तिक कार्याचे अवशेष ठेवले गेले आहेत!
मेथोडीस्त मंडळीतून मी खूप काही शिकलो आहे. त्यांच्या बर्याच चांगल्या उदाहरणांचे मी अनुसरण केले आणि त्यांच्या संस्थापकांच्या जीवनाचा अभ्यास केला. त्या मंडळीचे अनुसरण करण्यात, देवाने मला माझ्या सेवेसाठी खूप द
६. पवित्र आत्मा तुम्हाला ज्या चांगल्या गोष्टी दाखवतो त्याचे तुम्ही अनुसरण केले पाहिजे.
तुम्ही चांगल्याची आस्था बाळगणारे असाल तर तुमचे वाईट करणारा कोण?
१ पेत्र ३:१३
तुम्ही चांगल्या गोष्टींचे अनुसरण केले पाहिजे. कोणाच्या तरी सेवेतील चांगल्या गोष्टीबदल पवित्र आत्मा तुमच्या अंतःकरणाला जर स्पर्श करत असेल, तुम्ही काहीतरी करण्यासाठी देव तुमचे लक्ष वेढून घेत आहे. आपण अनुसरण कराव्यात अशा चांगल्या गोष्टी पवित्र आत्मा आपल्याला नेहमी दाखवतो. इतर मंडळया आणि सेवाकार्ये ह्याबद्दल चांगल्या गोष्टी पाहण्यास अंतःकरण खुले करणे तुमच्या हातात आहे.
कदाचित, कोणाच्यातरी मंडळीत संगीत किती चांगले आहे हे तुम्ही पाहता. कदाचित तो गायकवृंद किती चांगला आहे हे पाहता; कदाचित ते स्वच्छतागृह किती चांगले आहे हे पाहता. कोणाच्या तरी मंडळीची रचना किती चांगली आहे हे पाहता. कोणाचा तरी उपदेश किती चांगला आहे हे कदाचित तुम्ही पाहता. कोणाचे तरी गीत गाणे किती चांगले आहे हे तुम्ही पाहता. ह्या सर्व चांगल्या गोष्टी ज्या तुम्ही पाहता ह्या तर तुम्ही अनुसरण करावे म्हणून पवित्र आत्म्याकडून येणारे संदेश आहेत.
७. देवाच्या सेवकाचे अनुसरण करण्यात ते कोणाची नियुक्ती आणि निवड करतात हे पाहून तुम्ही करू शकता.
...........तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा: ह्या कारणास्तव मी तीमथ्याला तुमच्याकडे पाठवले आहे; तो माझा प्रिय व प्रभूच्या ठायी विश्वासू पुत्र असा आहे; मी सर्वत्र प्रत्येक मंडळीत शिकवतो त्याप्रमाणे ख्रिस्तातील माझ्या शिक्षणपद्धतीची आठवण तो तुम्हांला देईल.’’
१ करिंथकरास पत्र ४:१६-१७, एनएएसबी
करिंथ येथील लोकांनी पौलाचे जवळनियुक्ती करून त्याला करिंथयेथील लोकांबरोबर राहण्यास पाठवले. ज्या कोणाला पौलाशी संबंध ठेवायचा होता त्यांना तीमथ्याशी देखील संबंध ठेवावा लागत होता.
जे लोक नियुक्त व निवड केलेल्या लोकांशी संबंध च्नागले ठेवू शकत नाही ते शिकण्याची आणि अनुसरण करण्याची संधी गमावतात हे त्यांना जाणवत नाही. थोर लोक जबरदस्तीने तुमची भेट घेऊन बोलण्यासाठी कोणाचीतरी निवड करतात. मुख्य व्यक्तीशी तुम्ही संबंध ठेवू शकत नाही म्हणून कर तुम्ही बोलला नाही व संबंध ठेवला नाही तर, अनेक आशीर्वादांना तुम्ही मुकाल. नियुक्त लोकांचे अनुसरण करणे म्हणजे अनुसरण करण्याची कला आहे.
डेविड योंगी चौ ह्यांच्याशी बोलण्यासाठी मी अनेकदा कोरियाला गेलो. माझी काळजी घेण्यासाठी ज्या लोकांना त्यांनी निवडले होते त्यांच्याबरोबर व इतर बोर्ड सभासदांच्या बरोबर मला संबंध ठेवायचा होता. त्यांनी ज्या लोकांना नियुक्त केले त्यांना खुशीने स्वीकारल्यामुळे ती माझ्या त्यांच्या नात्यातून फायदा मिळवण्याची गुरुकिल्ली बनली आहे. जोकोणी नियुक्त अधिकाऱ्यांचे अनुसरण करण्यास खूप मोठा आहे तो अनुसरण करण्यासाठी खूप मोठा आहे!
८. देवाच्या सेवकाचे अनुसरण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल जर तुम्ही त्याचा विश्वास आणि संयम ह्यांचे अनुसरण कराल.
म्हणजे तुम्ही आळशी होऊ नये, तर विश्वासाच्या व धीराच्या योगे जे अभिवचनांचा वारसा उपभोगणारे होतात त्यांचे तुम्ही अनुकारी व्हावे.
इब्री ६:१२
विश्वास आणि संयम हे दोन गुणधर्म तुम्ही अनुसरण करणाऱ्या व्यक्तीत बघितले पाहिजे. मी असे का म्हणतो? शास्त्रवचन आपल्याला शिकवते की व्यक्तीचा विश्वास आणि संयम त्यांना देवाची अभिवचने वतन म्हणून प्राप्त करून घेण्यास सहाय्य करते.
केनेथ हगीण ह्यांचा विश्वास आणि संयम ह्यांनी त्याला जागतिक सेवाकार्य दिले. योंगी चौ ह्यांचा विश्वास आणि संयम ह्यांनी त्यांना जगातील सर्वात मोठी मंडळी दिली. बेनी हिंच्या विश्वासाने आणि संयमाने त्यांना त्यांच्या चमत्काराच्या सभा दिल्या. फ्रेड प्राईसच्या यांच्या विश्वासाने आणि संयमाने त्यांना ते सेवाकार्य दिले. रेन्हार्द बोन्के ह्यांच्या विश्वासाने आणि संयमाने त्यांना आफ्रिकेतील सर्वात मोठ्या सभा दिल्या.
पैसा, संबंध किंवा जाहिराती ह्या सर्व लोकांना ज्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत त्या देत नाहीत. त्यांना जे काही मिळाले ते त्यांच्या विश्वासाने आणि संयमाने मिळाले.
प्रिया मित्र, देवाचे अनुसरण करण्याच्या कलेत तुम्हाला यशस्वी व्हायचे आहे का? मग त्यांच्या विश्वासाचे आणि संयमाचे अनुसरण करा! कोणाच्यातरी विश्वासाचे अनुसरण करणे म्हणजे काय? कोणाच्यातरी विश्वासाचे अनुसरण करणे म्हणजे विचारणे, ‘’त्याने कशावर विश्वास ठेवला आणि ज्यावर विश्वास ठेवला तो का ठेवला!? बिली ग्राहम ह्यांच्या विश्वासाचा अभ्यास जेव्हा मी करत होतो तेव्हा मी पहिले की त्याने पवित्र शास्त्रातील प्रत्येक भाग हा देवाचे वचन आहे ह्यावर विश्वास ठेवण्याचा मोलाचा निर्णय घेतला. ह्याच विश्वासामुळे ते जेव्हा पापी लोकांना उपदेश करतात तेव्हा शास्त्रवचने बोलून दाखवतात. ते विश्वास ठेवतात की जर ही देवाची वचने असतील, तर जेव्हा त्यांचे लोकांसमोर वाचन होते, ह्या शब्दांमध्ये तारण देण्यास, बरे करण्यास आणि सुटका करण्यास खूप सामर्थ्य असते.
तुम्ही वाचन करून अभ्यास केला तर, थोर लोकांच्या विश्वासाबद्दल तुम्हाला खूप काही कळेल. एका थोर व्यक्तीच्या विश्वासाबद्दल तुम्हाला अधिक कसे कळू शकते? सेवेत पूर्वी त्या व्यक्तीने काय पाहिले आणि बोलले हे ऐकून तुम्हाला कळते! एखाद्या व्यक्तीच्या सेवेच्या नंतरच्या भागात, त्याने कशावर विश्वास ठेवला त्यांचे प्रभावी फळ तुम्हाला दिसतील. पण त्याच्या सेवेच्या सुरुवातीच्या भागात, देवामध्ये थोर गोष्टींसाठी व्यक्ती आपला विश्वास आचरणात आणते हे तुम्ही पाहाल. त्याच्या सेवेच्या सुरुवातीच्या भागात पाहण्यासाठी खूप कमी आहे आणि अधिक विश्वास व जाहीर करणे असते. अरण्यात लोक कसे उभे राहिले आणि त्यांच्या सेवेसाठी महान गोष्टींवर विश्वास ठेवण्यास कशी सुरुवात झाली हे पाहणे रुचकर आहे.
थोर लोकांच्या विश्वासाचे आणि संयमाचे अनुसरण करा आणि तुम्ही योग्य गोष्टींचे अनुसरण कराल. आज काही लोकांना देवाच्या सेव्कांप्रमाणे सारखे कपडे, बुट, घालणे व त्याच कार चालवणे आवडते. त्यांच्या घरामुळे, कारमुळे आणि कपड्यांमुळे त्यांनी आशीर्वाद वतन म्हणून मिळवले असे पवित्र शास्त्र सांगत नाही! त्यांच्या विश्वासाने व संयमाने त्यांनी अभिवचने वतन म्हणून मिळवली!
मग, तुम्ही कोणाच्यातरी संयमाचे अनुसरण कसे करू शकता? त्या व्यक्तीने कधी ठराविक गोष्टींवर विश्वास ठेवला आणि कधी खरच त्याचा अनुभव घेतला ह्याने त्यांच्या संयमाचा अभ्यास करू शकता. एका ठराविक दिशेत, जेव्हा लोक विश्वास ठेऊन कार्य करतात असे त्यांच्या संयमाचा अभ्यास केला तर, त्यातील काही लोक किती संयमी आहेत हे पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.
बरेच देवाचे सेवक ह्यांनी अनेक वर्ष खूप कमी निकषांनी श्रम करतात केवळ हे पाहण्यासाठी की त्यांच्या जीवनाच्या आणि सेवेच्या शेवटी प्रभूने महान गोष्टी केल्या. खरच, लोकांचा विश्वास आणि संयम त्यांच्या सेवेचे रहस्य आहे.
९. कोणाचे तरी अनुसरण करण्यासाठी तुम्ही आळस, निक्तीयता ह्यांच्यावर मात मिळवली पाहिजे.
म्हणजे तुम्ही आळशी होऊ नये, तर विश्वासाच्या व धीराच्या योगे जे अभिवचनांचा वारसा उपभोगणारे होतात त्यांचे तुम्ही अनुकारी व्हावे.
इब्री ६:१२
बरेच लोक अनुसरण न करण्याचे कारण आळस आहे ह्यावर तुमचा विश्वास आहे का? आळशी लोकांचे शब्द मी ऐकले आहेत ज्यांना अनुसरण करण्याची आणि शिकण्याची इच्छा नसते. ते तर फक्त एवढेच म्हणतात:
"वाह, देवाची कृपातुमच्या आयुष्यावर आहे.’’
ते म्हणतात, ‘’ह्या मंडळया ठेवण्यासाठी कृपा देवाने तुम्हाला दिली आहे.’’
"वाह’’, ते उद्गारतात, तुम्ही गोष्टी करण्याची पद्धत मका आवडते. तुमच्यावर ती कृपा आहे.’’
ते म्हणतात, ‘’तुमच्यावर आहे ती कृपा माझ्याकडे नाही. हे काही माझे पाचारण नाही.’’
होय, देवाची कृपा कार्यरत असेल ह्यात काहीच वाद नाही. पण बरेचदा, लोक काहीतरी नवीन शिकण्यास खूप आळशी असतात! कल्पना आणि तत्वे जे कार्यरत असतात त्यांना लागू करण्यासाठी त्यांना त्रास दिला जात नाही.
खरच, तुमच्यासमोर जे कोणी आहे त्यांच्यासारखे बनण्यास खूप कृपा लागते. एका पुढार्याचे रहस्य शोधून काढण्यास आणि नकल करण्यास खूप वेळ लागतो कळकळीचे प्रयत्न देखील लागतात. आळशी लोक अनुसरण करण्याच्या केलत यशस्वी होऊ शकत नाही.
अध्याय ३
अनुसरण करण्याच्या कलेच्या सात गुरुकील्ल्या
१. देवाच्या सेवकांचे अनुसरण त्यांच्या ‘’शिकवणी’’ किंवा त्यांच्या ‘’कृतींच्या’’ द्वारे करा.
थियफिल महाराज, येशूने जे प्रेषित निवडले होते त्यांना पवित्र आत्म्याच्या द्वारे आज्ञा केल्यानंतर तो वर घेतला गेला,
प्रेषित १:१
एखाद्या व्यक्तीच्या शिकवणी आणि ज्या गोष्टी तो करतो ह्या तितक्याच महत्वाच्या असतात. येशू ख्रिस्ताचे अनुसरण करण्यास त्याच्या शिकवणी आणि ज्या गोष्टी त्याने केल्या त्यांचे अनुसरण आपण केले पाहिजे. प्रत्येक शुभ्वर्तमानात ख्रिस्ताच्या शिकवणी आणि ज्या गोष्टी त्यांने केल्या त्या समाविष्ट आहेत. ख्रिस्ताच्या शिकवणी लाल अक्षरात असून त्याने केलेल्या गोष्टी काळ्या अक्षरात आहेत.
हे दोन्ही पैलू खूप विभिन्न पण महत्वाचे आहेत हे समजून घेणे जरुरीचे आहे. येशू ख्रिस्ताने बर्याच गोष्टींची शिकवण दिली नाही. खरच, तो काय करत होता ह्याचे स्पष्टीकरण दिल्याशिवाय अनेक गोष्टी त्याने केल्या. म्हणूनच थियफिल ह्याला येशूने काय केले आणि शिकवले ह्यातून शिकण्याचा सल्ला दिला गेला.
२. देवाच्या सेवकांचे अनुसरण त्यांच्या शिकवणीचे अनुसरण करण्याने करा.
काही लोकांना जे काही माहित आहे त्याबद्दल शिकवण्याचे वरदान आहे हे तुम्ही जाणून घेतले पाहिजे. ह्याचा परिणाम म्हणजे काही लोकांकडे बर्याच शिकवणी, सिद्धांत, घेतात. उदाहरणार्थ, केनेथ हेगेन, एक थोर संदेष्टा आणि आरोग्याचे सेवक, ह्यांनी सेवाकार्य कसे शिकवले ह्याविषयी विस्तारात बोलून देवासाठी कशा मोठ्या गोष्टी मिळवल्या ह्याविषयी शिक्षण दिले. त्यांच्या शिक्वनिमहोतो. काही इतर थोर संदेष्टे होते जे त्याच युगात राहून मृत्यू पावले पण इतरांसाठी काहीचत्याच सेवाकार्यात ते घेऊन जाऊ शकतील.
३. देवाचे सेवक काय करतात ह्याने त्यांचे अनुसरण करा.
प्रभूसाठी महान गोष्टी केलेले लोक मला सापडतात पण त्यांनी जे केले ते कसे केले ह्याविषयी खूप कमी शिकवणी मागे ठेवल्या आहेत. उदाहरणार्थ, कथ्रीन क्युल्मान ह्यांचे थोर चमत्काराचे सेवाकार्य होते जे मी न्याहाळतो आणि त्यातून खूप काही शिकतो. पण त्यांच्या कोणत्याही शिकवणीतून चमत्कार सेवाकार्यात प्रवेश कसा करायचा हे मी शिकू शकलो नाही.
तरही, कथ्रीन क्युल्मान ह्यांनी ज्या गोष्टी प्रत्यक्षात केल्या ह्यांचा अभ्यास करण्याने मला खूप मदत झाली आहे. वारंवार त्यांचे आत्मचरित्र वाचणे ह्याने मला त्यांनी आरोग्याच्या सेवेत काय केले ह्यात एक खोलवर दूरदृष्टी दिली
जरी मी जॉन वेस्ली ह्यांच्या शिकवणीतून खूप आग्रहाने शिकण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या कोण्याही शिकवणी मला समजल्या नाहीत. खरच, इंग्रजी भाषा खूप वेगळी आहे. तरीही,