इतर लोक....
()
About this ebook
पवित्र शास्त्र आपल्याला ह्याबद्दल बोध देतेरू ‘’तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसर्यांचेही पहा’’ (फिलीप्पेकरास पत्र २:४). ह्याच अगदी योग्य वेळी हाती पडलेल्या पुस्तकात, डाग हेवर्ड मिल्स आपल्याला स्वतःच्या पलीकडे जाऊन इतरांचा देखील विचार करायला सांगतात! इतरांवर देखील प्रेम करा! इतरांचा देखील विचार करा! इतरांची देखील काळजी करा! इतरांसाठी देखील जगा! येशू आपल्यासाठी मरण पावला कारण त्याने ‘’इतरांचा ‘’ देखील विचार केला. मला त्यासारखे अधिक बनायचे आहे. तुम्हाला येशुसारखे अधिक बनायचे आहे काय?
Dag Heward-Mills
Bishop Dag Heward-Mills is a medical doctor by profession and the founder of the United Denominations Originating from the Lighthouse Group of Churches (UD-OLGC). The UD-OLGC comprises over three thousand churches pastored by seasoned ministers, groomed and trained in-house. Bishop Dag Heward-Mills oversees this charismatic group of denominations, which operates in over 90 different countries in Africa, Asia, Europe, the Caribbean, Australia, and North and South America. With a ministry spanning over thirty years, Dag Heward-Mills has authored several books with bestsellers including ‘The Art of Leadership’, ‘Loyalty and Disloyalty’, and ‘The Mega Church’. He is considered to be the largest publishing author in Africa, having had his books translated into over 52 languages with more than 40 million copies in print.
Related to इतर लोक....
Related ebooks
अनागाझो Rating: 0 out of 5 stars0 ratingsलायकोस: अदिक्षित लोक आणि सेवाकार्य Rating: 0 out of 5 stars0 ratingsतुमचे सेवाकार्य वाढवा Rating: 0 out of 5 stars0 ratingsअहिंसा Rating: 0 out of 5 stars0 ratingsजे अज्ञानी असतात Rating: 0 out of 5 stars0 ratingsविश्वासातून माघारी जाणे Rating: 0 out of 5 stars0 ratingsआपल्या पाळकीय सेवेला बदला Rating: 5 out of 5 stars5/5अनुसरण करण्याची कला Rating: 0 out of 5 stars0 ratingsअध्यात्मिक धोके Rating: 0 out of 5 stars0 ratingsसेवाकार्यातील नैतिकता Rating: 0 out of 5 stars0 ratingsबोलावलेले पुष्कळ आहेत Rating: 0 out of 5 stars0 ratingsजगत कर्ता कोण? Rating: 0 out of 5 stars0 ratingsझाड आणि तुमचे सेवाकार्य Rating: 0 out of 5 stars0 ratingsदुष्ट आत्मे आणि त्यांच्याशी कसा व्यवहार कराल Rating: 5 out of 5 stars5/5तुमच्या सेवाकार्याचा संपूर्ण पुरावा तुम्ही कसा तयार करावा Rating: 0 out of 5 stars0 ratingsत्यांना सांगा तुम्ही आत्मे जिंकणारा का व्हायला पाहिजे याची १२० कारणे Rating: 0 out of 5 stars0 ratingsमी कोण आहे Rating: 4 out of 5 stars4/5चमत्कार Rating: 0 out of 5 stars0 ratingsक्लेश रहित जीवन Rating: 0 out of 5 stars0 ratingsमानवधर्म Rating: 0 out of 5 stars0 ratingsमृत्यूवेळी, आधी आणि नंतर Rating: 0 out of 5 stars0 ratingsमंडळी रोपण Rating: 0 out of 5 stars0 ratingsअभिषेकाचे मधुर प्रभाव Rating: 0 out of 5 stars0 ratingsपाळक करतात त्या दहा मुख्य चुकां Rating: 5 out of 5 stars5/5कर्माचे विज्ञान Rating: 5 out of 5 stars5/5Lok Vyavhar Rating: 0 out of 5 stars0 ratingsमेंढपाळ होण्याचा अर्थ काय आहे Rating: 0 out of 5 stars0 ratingsप्रार्थना कशी करावी Rating: 0 out of 5 stars0 ratingsSwapna Sutra - Gupt Asleli Shetra Samjun Ghene Rating: 0 out of 5 stars0 ratingsमेंढपाळ बनण्याची कला Rating: 3 out of 5 stars3/5
Reviews for इतर लोक....
0 ratings0 reviews
Book preview
इतर लोक.... - Dag Heward-Mills
अध्याय १
तुम्हाला ‘’इतर लोकांच्या’’ बद्दल काय माहित असावे
तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसर्यांचेही पाहा. अशी ही चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायीही असोरू
फिलीप्पेकरास पत्र २:४-५
खूप वर्षांपूर्वी, देवाच्या राज्यातील एक थोर सेनापती ह्यांनी साल्वेष्ण आर्मी ह्याची संस्थापना केली. त्यांचे बरेच पुढारी होते आणि त्यांनी देवाच्या राज्यासाठी खूप फळ उत्पन्न केले. एके दिवशी, त्यांनी पुढार्यांच्या गटाला एक महत्वाची तार पाठवली. त्यांनी म्हंटले की त्या तारेचे वाचन होत असताना सर्वांनी तिकडे हजर असावे. सर्व पुढारी तिकडे थोर अपेक्षेने एकत्र जमा झाले, आणि तो महत्वाचा संदेश काय होता ह्यावर विचार करू लागले. जेव्हा सगळेजण तयार झाले, त्यांनी ती सीलबंद तार उघडली आणि मग जमावासमोर त्याचे वाचन करण्यास सुरु केले. तेव्हा त्यांना धक्का बसला! खूप लांबलचक पत्र ज्यात सूचना असतील ह्या ऐवजी, ह्या विशेष तारेत केवळ एकच शब्द होता.
तो दुसरा शब्द काय होता ह्याच अंदाज करा, तो होता ‘’इतर लोक’’! साल्वेष्ण आर्मीचे पुढारी जे तिकडे एकत्र जमले होते थक्क झाले, आणि त्या संदेशाचे ’’इतर लोक’’ ह्याचे काय करायचे ह्याचा विचार करू लागले. ह्या असाधारण संदेशाचा विलियम बूथ ह्यांना काय अर्थ कळवायचा होता? त्या ठिकाणी शांतपणे बसून तो शब्द ’’इतर लोक’’ ह्यावर विचार करत असताना, मला खात्री आहे की देव त्यातील प्रत्येकाशी बोलला. ’’इतर लोक’’ हा संदेश सर्व ख्रिस्ती लोकांसाठी आहे.
’’इतर लोक’’ ! ह्याचा संदेश
१.इतर लोक ‘’ ह्यांचा संदेश म्हणजे ’’इतर लोक’’ अस्तित्वात असतात!
२.‘’इतर लोक ‘’ ह्यांचा संदेश म्हणजे आपले लक्ष आणि मन ‘’इतर लोक ‘’ ह्यांच्यावर असावे!
३.‘’इतर लोक ‘’ ह्यांचा संदेश म्हणजे आपण ‘’इतर लोक ‘’ ह्यांच्यासाठी आपले जीवन खर्च करावे!
४.‘’इतर लोक ‘’ ह्यांचा संदेश म्हणजे आपण ‘’इतर लोक ‘’ ह्यांच्यासाठी जगावे!
५.‘’इतर लोक ‘’ ह्यांचा संदेश म्हणजे आपण ‘’इतर लोक ‘’ ह्यांची सेवा करावी!
६.‘’इतर लोक ‘’ ह्यांचा संदेश म्हणजे आपण ‘’इतर लोक ‘’ ह्यांच्यासाठी स्वतःच्या जीवनाला अर्पण करावे!
७.‘’इतर लोक ‘’ ह्यांचा संदेश म्हणजे देवाने दिलेल्या सर्व आशीर्वादांचा उपयोग आपण ‘’इतर लोक ‘’ ह्यांची काळजी घेण्यासाठी करावा!
‘’इतर लोक ‘’ ह्यांच्याबद्दल ज्या चार गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे
‘’इतर लोक ‘’ ह्यांचा संबंध येतो तेव्हा चार गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. जर या चार गोष्टी आपण लक्षात ठेऊ शकलो तर, ‘’इतर लोक ‘’ ह्यांच्याप्रती आपण योग्य वृत्ती ठेऊ शकणार आहोत.
१. इतरांना ख्रिस्ताची गरज आहे!
ती स्त्री त्याला म्हणाली, मशीहा, ज्याला ख्रिस्त म्हणतात तो, येणार आहे हे मला ठाऊक आहेय तो आल्यावर आम्हाला सर्व गोष्टी सांगेल. येशू तिला म्हणाला, जो तुझ्याबरोबर बोलत आहे तो मी तोच आहे, इतक्यात त्याचे शिष्य आले आणि तो एका स्त्रीबरोबर बोलत आहे ह्याचे त्यांना आश्चर्य वाटले, तरी आपण काय विचारत आहा किंवा आपण तिच्याबरोबर का बोलत आहा असे कोणी म्हंटले नाही. ती स्त्री तर आपली घागर तेथेच टाकून नगरात गेली व लोकांना म्हणाली, चला, मी केलेले सर्वकाही ज्याने मला सांगितले तो मनुष्य पहा, तोच ख्रिस्त असेल काय? तेव्हा ते नगरातून निघून त्याच्याकडे येऊ लागले.
योहान ४:२५-३०
नेहमी लक्षात ठेवा की असे लोक आहेत ज्यांना ख्रिस्ताची गरज आहे. असंख्य लोकांना येशू ठाऊक नाही कारण मंडळी ‘’इतरांचा’’ विचार करण्यात अपयशी झाली आहे. ‘’इतरांना’’ अजूनही ख्रिस्त ठाऊक नाही ह्या वास्त्विक्तेचा विचार बरेच ख्रिस्ती लोक करत नाहीत. त्यांच्या मंडळयांमध्ये व सुंदर सह्भागीतेत ख्रिस्ताचा आस्वाद घेण्यासाठी ते खुश असतात. कृपया हे लक्षात ठेवा की अनेक, अनेक लोकांना ख्रिस्त ठाऊक नाही आणि शुद्ध शुभवर्तमान त्यांच्याप्रत गाजवले जाण्याची ते वाट पाहत आहेत.जर कोणीतरी त्यांना साक्ष सांगितली तरच अनेक लोक आपले हृदय देवाला देतील. निश्चित, ‘’इतर लोकांना ‘’ ख्रिस्ताची गरज आहे!
शोमरोनी स्त्री ‘’’इतरांची’’ आठवण करण्यात अगदी जलद होती. येशूला माहित करून घेण्यासाठी जेव्हा तिला आशीर्वादित केले गेले, तिच्या शहरातील सर्व लोकांचा विचार तिने केला ज्यांना येशुबद्द्ल काहीच माहित नव्हते. शोमरोनी स्त्री ही ‘’इतरांची’’ आठवण केल्याचे उत्तम उदाहरण आहे. काहीतरी चांगले प्राप्त करून घेण्यासाठी बरेच लोक खुश असतात पण क्वचितच इतर लोकांकडे ते नाही असा विचार करतात.
२. इतरांना मेंढपाळाची गरज आहे!
ह्या मेंढवाड्यातील नव्हेत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत, तीही मला आणिली पाहिजेतय ती माझी वाणी ऐकतीलय मग एक कळप, एक मेंढपाळ असे होईल.
योहान १०:१६
माझ्याकडे इतर मेंढरे आहेत!
ह्याचा अर्थ इतर ठिकाणी मेंढरे आहेत जे त्यांच्या मेंढपाळाची वाट बघत आहेत. ज्या इतर लोकांना येशूच्या मेंढपाळाच्या दृष्टीने काळजी व आपुलकी घेण्याची आवश्यकता आहे अशा लोकांची जाणीव येशूला होती. ज्या ‘’इतर’’ लोकांना येशूचे मेंढपाळ बनणे आणि पाळकीय